डोळे, नाक आणि पाय सोडून बाकीचे शरीर पांढऱ्या रंगाचे असलेली शेकरु खार 5shekru2राज्यात महाबळेश्वरमध्ये प्रथमच दिसली आहे. याशिवाय महाबळेश्वरमध्येच संपूर्ण शरीर पांढरे आणि गुलाबीसर डोळे असलेल्या शेकरुचीही नोंद करण्यात आली आहे. मे महिन्यात राज्यभर केल्या गेलेल्या शेकरु गणनेचा अहवाल समोर आला असून या प्रगणनेनुसार राज्यात अंदाजे ३३०० शेकरु आहेत.
महाबळेश्वरमधील लिंगमळा येथे संपूर्ण शरीर पांढऱ्या रंगाचे असलेले (अल्बिनो) शेकरु आढळले. या शेकरुंचा पांढरा रंग शरीरात मेलॅनिन द्रव्याची कमतरता असल्यामुळे आलेला असतो. या शेकरुंचे डोळे गुलाबीसर आहेत. याबरोबरच महाबळेश्वरमध्ये डोळे, नाक आणि पाय सोडून उर्वरित शरीर पांढऱ्या रंगाचे असलेल्या शेकरुंचीही नोंद झाली. या शेकरुंची गणना ‘ल्युसिझम’ या वर्गात झाली असून त्यांचा पांढरा रंग मेलॅनिन नसल्यामुळे नव्हे, तर जनुकीय बदलामुळे असावा असा अंदाज असल्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी सांगितले.
राज्यात शेकरुंची एकूण १९,७६९ घरटी आढळली आहेत. त्यावरुन राज्यात ३३०० शेकरु असल्याचा वन विभागाचा अंदाज असून यातील १०७८ शेकरु प्रगणनेत प्रत्यक्ष दृष्टीस पडले आहेत. प्रत्येक शेकरु आपल्या परिसरात ६ ते ८ घरटी बांधत असल्यामुळे एकूण घरटय़ांच्या संख्येला ६ ने भागून शेकरुंची अंदाजे संख्या काढली जाते.
शेकरु हा महाराष्ट्राचा ‘राज्य प्राणी’ असून भीमाशंकर आणि फणसाड अभयारण्ये शेकरुंसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु पश्चिम घाटात सिंधुदुर्ग ते नाशिक या परिसरातल्या निमसदाहरित वनांमध्ये, तसेच विदर्भात गडचिरोली वनविभागाच्या आलापल्ली आणि सिरोंचा भागातही शेकरु आढळतात. या शेकरुंच्या संख्येची निश्चित माहिती नसल्यामुळे मे महिन्यात पहिल्यांदाच राज्यभर शेकरुंची प्रगणना करण्यात आली.

‘महाबळेश्वरमधील स्थानिकांकडून पांढरे शेकरु पाहिल्याचे सांगण्यात येते. या भागात प्रथमच शेकरुंचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात पांढऱ्या शेकरुंच्या नोंदी मिळाल्या. उष्णता अधिक असलेल्या भागातील चंद्रपूर, गडचिरोली, दांडेली येथे शेकरुंच्या कातडय़ाचा रंग गडद आढळतो. तसाच रंग सावंतवाडी येथील शेकरुंचा आढळला आहे. विदर्भातील शेकरुंच्या रंगापेक्षा भीमाशंकरच्या शेकरुंचा वरच्या बाजूचा रंग गडद असतो. याहीपेक्षा गडद रंगाच्या कातडय़ाचे शेकरु सावंतवाडीत आढळले आहेत. राज्यभरातील शेकरुंच्या नोंदी घेण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. सलग तीन वर्षे नोंदी घेतल्यानंतर शेकरुंची संख्या आणि त्यांच्यातील प्रकारांविषयी निश्चित अंदाज बांधता येतील.’
– सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
nagpur drug smuggling, drug smuggling uganda via doha marathi news
युगांडाहून दोहामार्गे ८.८१ कोटींच्या अंमलीपदार्थाची तस्करी; नागपूर विमानतळावर एकाला अटक
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना