हजारो कोटी बुडवून पळालेल्या मल्याचे सरकारने काय केले ?

शरद पवार यांनी ७१ हजार कोटींचे शेतक ऱ्यांचे कर्ज माफ केले, आता तशीच वेळ पुन्हा आल्याचे सांगत कांदा, टॉमेटो रस्त्यावर फेकून द्यावे लागतात, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतक ऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवीत केले. नऊ हजार कोटी बुडवून विजय मल्या निघून गेला, त्याचे सरकारने काय केले, अशी विचारणा करतानाच पुणे, िपपरीतील नागरिकांना जर स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार असेल तर दौंड, बारामती, इंदापूरच्या नागरिकांनी दूषित पाणी का म्हणून प्यायचे, असा मुद्दाही अजितदादांनी उपस्थित केला.

loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : शेवटी आर्थिक फटका शेतकऱ्यांनाच!
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
maval lok sabha mahayuti marathi news, shrirang barne latest news in marathi
श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढल्या, चिंचवडमधून भाजपाचा विरोध कायम
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी

िपपरी पालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ अजितदादांच्या हस्ते झाला, तेव्हा सांगवीतील समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, नऊ हजार कोटी बुडवून विजय मल्या निघून गेला. शेतक ऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार पैसे देत नाही आणि मल्याला मोकाट सोडते. फोन कंपन्यांना तुम्ही तीन हजार कोटींची सवलत देता, व्यापाऱ्यांसाठी एलबीटी माफ करता, मात्र, तीन वर्षे दुष्काळात अडकलेल्या शेतक ऱ्यांना मदत देत नाही. थोडा जरी कांदा वाढला की वांदा होतो. रस्त्यावर कांदा फेकून देण्याची वेळ येते. टोमॅटो रस्त्यावर टाकावे लागतात, त्या शेतक ऱ्यांना कोणी वाली नाही. कधीतरी शेतक ऱ्याला दोन पैसे मिळत असतील तर काय हरकत आहे. काही दिवसांपूर्वी तुरडाळीचा भाव २०० रुपयांपर्यंत गेला होता, व्यापाऱ्यांनी तुफान फायदा उठवला. शेतक ऱ्यांना काहीच मिळाले नाही, याचा विचार शहरी भागातील लोकांनी केला पाहिजे. केलेल्या कष्टाचे पैसे त्याला मिळालेच पाहिजे. आत्महत्या करण्याची वेळ शेतक ऱ्यावर येता कामा नये. किती दिवसांपासून गंगा, यमुनेच्या शुद्धीकरणाचे काम सुरू आहे. अजून तरी त्यामध्ये यश आलेले नाही. आपल्याकडील नदी प्रदूषणही प्रचंड वाढले आहे आणि हेच पाणी आमच्या दौंड, इंदापूर व बारामतीला जाते. त्या पाण्यात पाय घातला तर अंगाला खाज सुटते. जनावरे देखील ते पाणी पित नाही. तेच पाणी शेतात सोडल्यास तीव्र दरुगधी सुटते. या दूषित पाण्यामुळे विहिरी, बोअरवेल खराब झाल्याच्या तक्रारी शेतकरी करू लागले आहेत. जर पुणे, िपपरीला स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार आहे. तर मग खालच्या लोकांनी इथले खराब पाणी का म्हणून प्यायचे. दूषित पाण्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य बिघडते, रोगराई पसरते. यासंदर्भात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी चर्चा झाल्याचे अजितदादांनी सांगितले.ू

‘सैराट’ने लोकप्रियतेचा कळस गाठला आणि मराठी चित्रपटांची ताकद देशाला दाखवून दिली. अकलूज-करमाळ्याच्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. िरकू राजगुरूने तर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेतली. यश कोणतेही असो, त्याला जनतेचे पाठबळ आवश्यक असते.

– अजित पवार,