केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारमधून देवेंद्र फडणवीस हे केवळे नागरिकांना मोठी स्वप्ने दाखवत आहेत. केवळ स्वप्ने दाखवून कुणाचं भलं होत नसतं तर त्यासाठी अहोरात्र झटावे लागते असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

नोटाबंदीमुळे अडचणींना सामोरे जावं लागत आहे ५० दिवसांत प्रश्न सुटला नाही, ५० दिवस झाले अजून नोटा मिळत नाहीत. आजही नागरिकांच्या हक्कांचा आणि कष्टाचा पैसा काढायला बंधन आहे. आता ४,००० काढा ४,५०० रुपयेच काढा अस किती दिवस ऐकायचं. वास्तविक  आता बेकारी वाढायला लागली आहे. कारखानदारी बंद होत आहे. कामगार देशोधडीला लागले  आहेत. अशा विचित्र परिस्थितीमध्ये  सर्व जण अडकलेले आहेत.

स्वप्न दाखवून समाजच भलं होत नसतं. आम्ही पंचवीस वर्ष या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहोत कधी स्वप्न दाखवली नाहीत. कृती केली, वचनपूर्तीच राजकारण केलं म्हणून आज या शहराची बेस्ट सिटी म्हणून ओळख आहे. असा खोचक टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला लगावला ते दापोडी येथे भुयारी मार्गाच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.