ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे अध्यक्ष असलेल्या ‘भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासा’च्या नावातून ‘भ्रष्टाचार’ हा शब्द न वगळल्यामुळे पुण्यातील धर्मादाय सहआयुक्तांनी अण्णा हजारे आणि इतर विश्वस्तांना न्यासातून निलंबित करण्याचा निर्णय दिला. न्यासावर आता प्रशासक नेमण्यात येणार आहे.
न्यासाच्या नावातील भ्रष्टाचार शब्द वगळण्यासाठी यापूर्वीच अण्णा हजारे आणि इतर विश्वस्तांना नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, हा शब्द न वगळण्यात आल्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमाच्या कलम ४१ ड प्रमाणे विश्वस्तांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र, विश्वस्तांनी आपली बाजू मांडली नाही, असे धर्मादाय सहआयुक्त आपल्या आदेशात म्हटले आहे.