अज्ञाताच्या हल्ल्यात जखमी झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा मृत्यु झाला आहे. टेकवडे यांच्यावर गुरुवारी दुपारी त्यांच्या राहत्या घराजवळ हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना चाकूने भोसकण्यात आले. त्यानंतर टेकवडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला घडवून आणला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकवडे आणि त्यांची पत्नी गुरुवारी दुपारी बाहेरून येऊन घराकडे जात असताना त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकण्यात आली. त्यांच्या पत्नीने आरडाओरड सुरू केल्यावर हल्लेखोरांनी त्यांना चाकून भोसकले. यामुळे टेकवडे तिथेच कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतल्यावर हल्लेखोर पळून गेले. यानंतर टेकवडेंना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
टेकवडे हे मोहननगर (चिंचवड स्टेशन) प्रभागामधून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या पूर्वी त्यांनी २००२ मध्ये नगरसेवकपदाची निवडणूक लढविली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.