पोलिसांकडून कारवाईचा इशारा; दिव्यांची विक्री करण्यास मनाई

दिवाळीत आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांमुळे (फ्लाईंग लॅटर्न) आगी लागण्याच्या दुर्घटना घडतात. आकाशात सोडण्यात येणारे दिवे घरांच्या छतांवर तसेच झाडांवर पडतात. त्यामुळे आग लागण्याच्या घटना दरवर्षी दिवाळीत घडतात. या पाश्र्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. दिवे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.पोलीस आयुक्तांनी दिलेले आदेश २६ नोव्हेंबपर्यंत शहरात लागू राहणार आहेत.

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

दिवाळी सुरु झाल्यानंतर आकाशात पेटते दिवे सोडले जातात. चौकाचौकात थांबणाऱ्या तरुणांच्या गटांकडून अशा प्रकारचे दिवे सोडले जातात. फटाके विक्रेत्यांकडे हे दिवे विक्रीसाठी उपलब्ध असतात. नदीपात्र तसेच शहरातील विविध पुलांवर थांबणाऱ्या टोळक्यांकडून दिवा पेटवला जातो. पॅराशुटप्रमाणे हा दिवा उंच जातो. त्यानंतर पुन्हा दिवा जमिनीच्या दिशेने येतो.

दिवाळीत शहरात ठिकठिकाणी असे दिवे पाहायला मिळतात. दिवा जमिनीवर पडताना घर तसेच इमारतींच्या छतावर पडतो. पेटता दिवा छतावर ठेवण्यात आलेल्या अडगळीच्या सामानावर पडल्यानंतर आग लागते.

नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आकाशात दिवे सोडण्यास मनाई करणारा आदेश दिला आहे.

आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांची विक्री करण्यास पोलिसांनी मनाई केली आहे.

दिव्यांची विक्री तसेच आकाशात दिवे सोडल्यास भादंवि १८८ नुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असा इशारा पोलीस आयुक्त शुक्ला यांनी दिला.