23 August 2017

News Flash

मैत्रीतील अबोल्यातून तरुणीवर ब्लेडने वार

तरुणाला अटक

पिंपरी चिंचवड | Updated: June 19, 2017 3:20 PM

आरोपी ओंकार राऊत

पिंपरी-चिंचवडमध्ये २० वर्षीय तरुणाने घराजवळच राहायला असणाऱ्या मैत्रीणीवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. ओंकार राऊत असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव असून चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही ओंकार राऊत (वय २० रा.लिंक रोड, पत्रा शेड झोपडपट्टी) याची मैत्रीण आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पीडित तरुणी ही ओंकार याच्याशी बोलत नव्हती. याच काराववरून काल सायंकाळी सातच्या सुमारास पीडित तरुणीला एकटीला पाहून ओंकारने तिच्यावर वार केले. लिंक रोड, पत्रा शेड,झोपडपट्टी परिसरातच हा सर्व प्रकार घडला. ओंकारने तरुणीच्याहातावर, मांडीवर आणि पोटावर ब्लेडने वार केले आहेत. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे पीडित तरुणी (वय १८) आणि ओंकार राऊत याची मैत्री आहे. ते दोघेही शेजारी राहतात. घरच्यांनी दोघांना एकमेकांसोबत बोलायचे नाही, असे सांगितले होते. मुलीला तिच्या घरच्यांनी ओंकारसोबत बोलत असल्यामुळे मारहाण केली होती. त्यामुळे पीडित तरुणी ओंकारसोबत बोलणे टाळत होती, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून समजली आहे. ओंकार राऊत याला रात्री उशिरा चिंचवड पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.

First Published on June 19, 2017 3:17 pm

Web Title: boy blade attack on girl in pimpari chinchwad pune
 1. S
  sachin k
  Jun 19, 2017 at 7:15 pm
  छान/ कुरूप Disnyavarun maitri hot नसते.माणूस म्हणून सगळ्या नैसर्गिक भावना त्यात असणारच mag to छान aso nahitar कुरूप,pan yogya ani ayogya yatla farak fakt ani fakt uttam shikshanatun samju shakto त्यामुळे पाल्याचे योग्य शिक्षण aani तेही फक्त shaletalech नाही तर mule वयात वयात येताना पालकांनी त्यान्ना लैंगिक शिक्षण निसंकोच पणे देण्याची आता गरक ahe.karan या सगळ्या निसर्गसुलभ भावना असतानाही आपल्याकडे याला एक चोरट्या नजरे ने पाहण्याची वृत्ती सगळ्या समाजाला बदलावी लागेल ..
  Reply
 2. A
  Arun
  Jun 19, 2017 at 5:40 pm
  "मुलीला तिच्या घरच्यांनी ओंकारसोबत बोलत असल्यामुळे मारहाण केली होती"- काय बोलायचं ह्या मुलींनासुद्धा? जन्मदात्यांनी पालनपोषण केले म्हणून आपण वाढलो ह्याची साधी जाण न ठेवता एखाद्या मुलाच्या फुटकळ स्टाईलला भाळून पालकांनाच फाट्यावर मारतात? फोटोत दिसणारा तरुण आवडण्यासारखे काय आहे त्या तरुणात? समाजात जागोजागी असल्या टुकार पसंतीकरून जीवन व्यर्थ घालवलेल्या मुली पाहून आपल्या शिक्षण व्यवस्थेत जोडीदार निवडण्यासाठी काय गरजेचे आहे आणि काय केल्याने आयुष्य बरबाद होते याबाबत १०० मार्कांचा एक विषय परीक्षेला ठेवायला हवा. म्हणजे ब-याच बिनडोक मुला-मुलींच्या डोक्यात थोडातरी प्रकाश पडून ते योग्य नागरिक बनतील.
  Reply