पुण्यातील खडकी परिसरात शनिवारी (दि. २९) रात्री पावणे दहाच्या सुमारास मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असताना. घरावर गेलेला चेंडू काढताना ११ वर्षीय मुलाचा लोखंडी खांबाला हात लागून शॉक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती खडकी पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खड़कीतील मरिआई माता परिसरात असणाऱ्या लुंबिनी कुंज बुध्द विहारच्या बाजूला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास प्रितेश गणेश कांबळे हा क्रिकेट खेळत होता. त्याच दरम्यान त्या परिसरात राहणारे चंद्रकांत कांबळे यांच्या घरावर चेंडू गेला. त्या घराचे छप्पर हे पत्र्याचे होते आणि बाजूला एक लोखंडी खांब आहे. प्रितेश घरावर जाताना बाजूला असणाऱ्या खांबाला दोन्ही हाताने पकडले. तेवढ्यात त्याला शॉक बसल्याचे त्याच्या भावाच्या लक्षात येताच. त्याने झाडू मारून बाजूला काढले आणि त्वरीत जवळील खडकी कंटोन्मेंट रूग्णालयात नेले. डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. परिस्थिती लक्षात घेऊन रूग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”