पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे अपूर्णावस्थेत असलेली पाच मजली इमारत कोसळून शुक्रवारी पहाटे एका व्यक्तीचा मृत्यू झाला.  संदीप मोहिते असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 
building-collapse
काम अपूर्णावस्थेत असलेल्या या इमारतीत काही कुटुंब राहात होती. मात्र, इमारतीला तडे जात असून ती पडणार असल्याचे लक्षात  आल्यावर शुक्रवारी पहाटे आतमध्ये राहणारी माणसे इमारती बाहेर आली. पण इमारतीखाली लावलेली चारचाकी आणण्यास संदीप मोहिते  पुन्हा आत गेले असताना संपूर्ण इमारत खाली आल्याने ते चारचाकी गाडीच्या आतमध्ये अडकले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला, असे पोलीसांनी सांगितले. या इमारतीच्या बांधकामासाठी केवळ तीनच मजल्यांची परवानगी असताना पाच मजल्यांचे बांधकाम केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीसानी इमारतीचे बांधकाम करणारे किशोरभाई वडनेरा यांना ताब्यात घेतले आहे.