‘नृत्ययात्री’ संस्थेतर्फे ‘मयूरभंज छाऊ’ हे पारंपरिक नृत्य शिकण्यासाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध छाऊ नर्तक राकेश साई बाबू यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. १८ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत मनोहर मंगल कार्यालय येथे ही कार्यशाळा होणार आहे.
छाऊ हा मूळचा आदिवासी नृत्यप्रकार आहे. ओरिसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये छाऊ नृत्य प्रसिद्ध आहे. यामध्ये नर्तकाच्या एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये ढाल असते. युनेस्कोची मान्यता मिळालेले हे नृत्य प्रामुख्याने प्रादेशिक उत्सवांमध्ये पाहावयास मिळते. दिल्लीस्थित राकेश साई बाबू हे छाऊ नृत्यप्रकारातील मयूरभंज या शाखेचे प्रसिद्ध नर्तक आहेत. ते संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते अनंतचरण साई बाबू यांचे नातू आणि मयूरभंज छाऊ गुरु जन्मेजय साई बाबू यांचे पुत्र आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले असून त्यांना अनेक पुरस्कारही लाभले आहेत.
या कार्यशाळेत राकेश साई बाबू हे शरीर संतुलन, नृत्यादरम्यानच्या हालचाली, नृत्य तंत्र याबरोबरच नृत्यप्रकारातील लहानसहान प्रकारांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. शास्त्रीय, पाश्चात्त्य आणि समकालीन नृत्य शिकणाऱ्या १५ वर्षांवरील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असलेली ही कार्यशाळा सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत होणार आहे. इच्छुकांनी अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ९८८११४८८५० किंवा ९८५००४३३५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Discovery of four new species of lizard from Kolhapur and Sangli districts  Nagpur
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे यश
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा