अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासमवेत जाणार

िपपरी पालिकेतील चिखली-कुदळवाडी प्रभागाचे मनसेचे नगरसेवक राहुल जाधव यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासोबत पुढील राजकीय प्रवास करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. मनसेत काहीही राजकीय भवितव्य नसल्याची स्पष्ट जाणीव झाल्यानेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांनी सोयीस्करपणे हा निर्णय घेतला आहे. मनसेचे यापूर्वीचे शहराध्यक्ष मनोज साळुंके यांनीही लांडगे यांच्यासाठी पक्ष सोडला होता.

ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
Ravindra Dhangekar
“त्यांच्याकडे पहिलवान असले, तर आमच्याकडे..”, रवींद्र धंगेकर यांचा मोहोळ यांना टोला; शरद पवारांची घेतली भेट

िपपरी पालिकेत मनसेचे चार नगरसेवक आहेत. त्यापैकी निगडीतील नगरसेवक मंगेश खांडेकर पूर्वीपासूनच पक्षात सक्रिय नाहीत. विधानसभा निवडणुकीत तत्कालीन शहराध्यक्ष साळुंके यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाऊन महेश लांडगे यांचा प्रचार केला होता, तेव्हापासून त्यांनी पक्ष सोडला आणि लांडगे यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. तेव्हापासून रिक्त असलेल्या मनसेच्या शहराध्यक्षपदाविषयी दोन वर्षांत कोणताही निर्णय झालेला नाही. जाधव यांचे नाव शहराध्यक्षपदासाठी चर्चेत होते, मात्र त्यांनी रस दाखवला नाही. निवडणुकांची धामधूम सुरू झाली असताना जाधव यांनी पक्ष सोडण्याची भूमिका घेतल्याने मनसेला धक्का बसला आहे. िपपरी पालिकेवर प्रथमच निवडून आलेले जाधव हे आमदार लांडगे यांचे समर्थक आहेत. विधानसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार िरगणात असताना जाधव यांनी उघडपणे लांडगे यांचा प्रचार केला होता. गेल्या काही दिवसांपासून अधिकृतपणे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात ते होते. त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला आहे.

मनसेमध्ये राहणार नाही, हे नक्की केले आहे. यापुढील राजकीय प्रवासात आमदार महेश लांडगे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

– राहुल जाधव, नगरसेवक