मावळ लोकसभा मतदारसंघातील १९ लाख ५२ हजार १९८ मतदारांपैकी ११ लाख ४० हजार २५१ मतदारांनी (५८.३९ टक्के) आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची सर्वाधिक टक्केवारी उरण मतदारसंघात (७२.१० टक्के) असून पिंपरीत सर्वात कमी (४८.८३ टक्के) मतदान झाले आहे. मुख्य प्रतिस्पर्धी असलेले लक्ष्मण जगताप व श्रीरंग बारणे दोघेही चिंचवड मतदारसंघातील असून तेथे झालेल्या अडीच लाख मतदानाची वाटणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मावळातील एकूण १९ लाख ५२ हजार मतदारांमध्ये पुरुष मतदार १० लाख ३४ हजार ९६४ आहेत. तर, ९ लाख १७ हजार २३४ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात चिंचवडला झालेले सुमारे अडीच लाख मतदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विजयी होऊ पाहणाऱ्या उमेदवाराला याच मतदासंघात आघाडी मिळवावी लागणार आहे. जगताप व बारणे यांच्यात चिंचवड मतदारसंघातील मते खेचण्यासाठी स्पर्धा झाल्याचे दिसून येते.
 
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी-

मतदारसंघ            झालेले मतदान            टक्केवारी
चिंचवड            दोन लाख ४४ हजार        ५८.३३
पनवेल            दोन लाख ११ हजार        ५८.३३
िपपरी                एक लाख ७२ हजार        ४८.८३
मावळ                एक लाख ८० हजार        ६७.८४
उरण                एक लाख ७३ हजार        ७२.१०
कर्जत                     एक लाख ५६ हजार        ६८.४०