पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी पंढरपुरातील भाजप पुरस्कृत खासदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात पोस्टर्स लावली होती. या पोस्टर्सवर भाजपचाही उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे संतापलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एसआयएफच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी एसएफआयकडून दुपारी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एसएफआय आणि अभाविपच्या ९ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अभाविपच्या राम सातपुते, राहुल चंदल, हृषिकेश सरगर, करणं शिर्के तर एसएफआयच्या नाशिर शेख, सतीश पडवलेकर, सतीश दुबडे आणि संदीप यांचा समावेश आहे.

एसफएआय आणि अभविप च्या विद्यार्थ्यांमध्ये काल रात्री पोस्टरवरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनिकेत कैंटीन परिसरात हाणामारी घटना घडली. याप्रकरणी एसएफएआयच्या पाच तर अभाविपच्या चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंगल आणि मारहाणीचा गुन्हा चतु: श्रुंगी पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  काल रात्री आठच्या सुमारास विद्यार्थ्यांमध्ये  प्रशांत परीचारिकाचे पोस्टर लावल्यावरुन वाद होऊन जोरदार हाणामारी झाली.यामध्ये दोन्ही गटामधील विद्यार्थी काहींना लागले आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली.