‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये संदीपच्या विक्रमाची नोंद

स्वातंत्र्योत्तर काळापासून चित्रपटांसंदर्भात निघालेल्या पोस्टाच्या तिकिटांचे संकलन हा छंद संदीप बोयत या युवकाला एका विक्रमाकडे घेऊन गेला. त्याच्या या अडीचशे पोस्टाच्या तिकिटांच्या संकलनाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.

Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
article-370-box-office-record
‘आर्टिकल ३७०’ने मोडला ‘द काश्मीर फाइल्स’चा रेकॉर्ड; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
sebi summons many former directors in financial irregularities in zee
‘झी’मधील आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीचा विस्तार;‘सेबी’कडून कंपनीच्या अनेक माजी संचालकांना समन्स
Tania Sing Ends her Life
लोकप्रिय मॉडेलची आत्महत्या, शेवटच्या कॉलमुळे IPL मधला प्रसिद्ध खेळाडू अडचणीत

चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर गारुड निर्माण केले. पूर्वी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पोस्टाच्या तिकिटांच्या माध्यमातून प्रथम दिवस आवरण प्रसिद्ध होत असे. पुण्यात वास्तव्यास असलेल्या संदीप बोयत याने विविध ठिकाणांहून अशा तिकिटांचे संकलन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून म्हणजेच १९४७ पासूनची हिंदूी चित्रपटांची सुमारे दोनशे आणि हॉलीवूडच्या पन्नास चित्रपटांची तिकिटे बोयत याच्या संग्रहात आहेत. संदीप बोयतचा जन्म पुण्यातीलच. त्याचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी, तर वडील रमेश बोयत हे सहायक कॅमेरामन म्हणून काम करीत. त्यामुळे संदीपला घरातूनच चित्रपटसृष्टीचे बाळकडू लाभले. मोठय़ा कलाकारांना भेटण्याची संधी मिळावी या इच्छेतून त्याने वयाच्या १५ व्या वर्षीपासून पोस्टाची तिकिटे जमवण्यास सुरुवात केली, असे चित्रपटसृष्टीत कनिष्ठ कलाकार तसेच छायाचित्रकार असलेल्या संदीपने सांगितले.

मेहमूद, मदन मोहन, ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन, मोतीलाल, उत्तम कुमार अशा अभिनेत्यांची छायाचित्रे असलेल्या पोस्टाच्या तिकिटांचा त्याच्या संग्रहात समावेश आहे. ‘जीना तेरी गली में’, ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘हिमालय की गोद में’, ‘सूरसंगम’ या चित्रपटांच्या तिकिटांचाही अंतर्भाव आहे. पोस्टाची तिकिटे जमवण्याच्या हेतूने महाराष्ट्रभर फिरता आले. धर्मेद्र, दिलीप प्रभावळकर, श्रीराम लागू अशा आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळाली. १९८० च्या दशकात चित्रपट, मालिका यांच्यावर बेतलेली पोस्टाची तिकिटे प्रसिद्ध करण्याची प्रथा बंद झाली. त्या काळातील ही माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही तिकिटे उपयुक्त आहेत, असे संदीप बोयत याने सांगितले.