देशाच्या विविध प्रांतातील खाद्यसंस्कृती खवय्या मंडळींपर्यंत पोहोचण्यासाठी ‘कनेक्ट विथ लोकल’ (www.connectwithlocl.com) या संकेतस्थळाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतातील रुचकर घरगुती पदार्थाची चव घरबसल्या चाखण्याची मिळाली आहे.
हे कसे करायचे? त्याची पद्धत अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे. खवय्यांनी संकेतस्थळावर साईनअप करायचे आणि आवडती पाककृती निवडून त्याचे बुकिंग करायचे. पाककृतींचे बुकिंग झाल्यानंतर तयार करणारा (होस्ट) आणि खवय्या (गेस्ट) यांच्या सहमतीनंतर या मेजवानीसाठी एक दिवस निश्चित होतो. त्या ठरलेल्या दिवशी मेजवानीचा आनंद लुटण्यासाठी पदार्थाची निर्मिती करणाऱ्या यजमानांच्या घरी बुकिंग करणारे पाहुणे म्हणून जेवायला जातात ही संकल्पना ‘कनेक्ट विथ लोकल’ संकेतस्थळाने प्रत्यक्षात आणली आहे. ओडिशाला भेट दिल्यानंतर श्रीराम कुंटे यांच्या मनामध्ये ही नावीन्यपूर्ण संकल्पना आली. या कामी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) बीई-प्रॉडक्शन, मार्केटिंग, फायनान्स पदव्युत्तर पदवी संपादन केलेले मंगेश वाघ आणि मार्केटिंग मॅनेजमेंटची पदविका संपादन केलेले समीर आठल्ये यांनी कुंटे यांना या कामी मदत केली आहे.
या संकेतस्थळावर साइनअप होऊन ‘होस्ट’ला रजिस्ट्रेशन करावे लागते. भिन्न प्रांतातील वैशिष्टय़पूर्ण पदार्थ बनविणारे या संकेतस्थळावर वेगवेगळ्या पाककृतींची छायाचित्रे पोस्ट करतात. त्यांचा आस्वाद घेऊ इच्छिणारे ऑनलाईन बुकिंग करतात. त्यासाठीची रक्कम संकेतस्थळाकडे जमा केली जाते. पाककृती आणि तिचा दिवस यांची नोंदणी केल्यानंतर खवय्याला आणि होस्टला कन्फर्मेशनचा ई-मेल आणि एसएमएस जातो. पाककृती मिळण्याच्या आदल्या दिवशी दोघांनाही रिमाइंडरचा आणि मिळाल्यानंतर फिडबॅकसाठी एसएमसएस जातो. दोघांच्या सोयीने ही मेजवानी निश्चित केली जाते. नोंदणी केलेले पाहुणे यजमानांच्या घरी जाऊन भोजनाचा आस्वाद घेतात आणि त्यांच्या संस्कृतीची माहिती देखील जाणून घेतात. ही संकल्पना आकाराला आली असल्याची माहिती श्रीराम कुंटे यांनी दिली.

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत