नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती आत्महत्या करते. चिंताग्रस्त, तणाव आणि निराशा यापोटी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये २८ ते ३५ वर्षे वयोगटांतील युवकांची संख्या ५५ ते ६० टक्के आहे. तर, शालेय विद्यार्थ्यांमध्येही आत्महत्या करण्याच्या प्रमाणामध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दर दहा जणांमागे एकाचा मृत्यू होतो.
ही सारी निरीक्षणे आहेत ‘कनेक्टिंग एनजीओ’ या स्वयंसेवी संस्थेची. ज्यांच्या घरामध्ये आत्महत्या झाली आहे, अशा घरातील लोकांशी संवाद साधून त्या कुटुंबीयांना आधार देणे आणि आत्महत्या केल्यानंतर सुदैवाने बचावलेल्या व्यक्तीलाही आधार देण्याचे काम ही संस्था करते. ‘आम्ही ऐकतो, आमच्याशी बोला’ हे ब्रीद घेऊन संस्थेने हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनला चांगला प्रतिसाद लाभत असून, दरमहा किमान अडीचशे ते तीनशे व्यक्तींशी या माध्यमातून संवाद साधला जात आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनघा छत्रे यांनी दिली.
एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करते ही काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. आयुष्य संपवून टाकावे या मानसिकतेपर्यंत पोहोचण्याआधी मोकळेपणाने बोलू शकतो, अशी चांगली साथ मिळाली तर ही संभाव्य आत्महत्या थोपवून धरता येऊ शकते. त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये आत्महत्या घडली अशा घरातील अन्य सदस्यदेखील आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात. अशा लोकांशी संस्थेचे ८० कार्यकर्ते संवाद साधतात. संस्थेच्या हेल्पलाइनचा १८००२०९४३५३ हा टोल-फ्री क्रमांक असून, आठवडय़ातील सातही दिवस दुपारी दोन ते रात्री आठ या वेळात संपर्क साधू शकतो. त्याचप्रमाणे ९९२२००११२२ या मोबाइल क्रमांकावरही संपर्क साधता येईल. संस्थेला समुपदेशन करण्यासाठी कार्यकर्त्यांची आवश्यकता असून, ज्यांना यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क साधावा. अशा कार्यकर्त्यांना त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाईल, असेही छत्रे यांनी सांगितले.
२१ नोव्हेंबर हा जागतिक आत्महत्याग्रस्त आधार दिवस (वर्ल्ड सव्र्हायव्हर्स ऑफ सुसाईड डे) म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून मोलेदिना रस्त्यावरील अतुर चेंबर्स येथील संस्थेच्या कार्यालयामध्ये २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ‘स्टोरीज ऑफ सव्र्हायव्हर’ हा लघुपट दाखविला जाणार आहे. तर, समाजामध्ये या विषयासंदर्भात जागृती घडवून आणण्याच्या उद्देशातून ५ डिसेंबर रोजी फेरी काढण्यात येणार आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
Women MP in parliement
Loksabha Election : महिला उमेदवारांची संख्या वाढतेय; पण जिंकणाऱ्यांचं प्रमाण का घटतंय? १९५७ पासूनची आकडेवारी काय सांगते?