महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असला तरी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे वाहने, कमानी, फ्लेक्स, भिंती रंगवणे आदी माध्यमातून इच्छुक उमेदवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे. स्वत:च्या चारचाकी वाहनांवर स्वत:ची छायाचित्रे रंगवूनही प्रचार सुरू आहे. तसेच अनेक इच्छुकांच्या समर्थकांनी दुचाकीच्या नंबरच्या पाटय़ांवर उमेदवारांची छायाचित्रे आणि पक्षाचे चिन्ह रंगवले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी मतदारांपर्यंत त्यांची छबी पोहोचविण्यासाठी अनेक युक्त्या अवलंबविल्या आहेत. ते करताना सध्या तरी आचारसंहितेकडे दुर्लक्ष केले जात आहे. ‘सदैव तत्पर, आपल्याच हक्काचा माणूस’ असे घोषवाक्य बहुतेक इच्छुकांनी प्रचारासाठी वापरले असून ते ज्या प्रभागातून इच्छुक आहे त्या प्रभागाचे नाव रंगवून ‘लक्ष २०१७’ अशा जाहिराती स्वत:च्या वाहनांवर केल्या आहेत. या शिवाय इच्छुकांच्या समर्थकांनी त्यांच्या दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेट इच्छुक उमेदवारांच्या छायाचित्रांनी रंगवल्या आहेत. निवडणूक विभागाने इच्छुकांच्या जाहिरातीचे फ्लेक्स हटविले असले तरी छुप्या पद्धतीने होत असलेल्या या प्रचाराकडे तसेच अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कमानींकडे दुर्लक्ष केले जात आहे.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

प्रचारासाठी विशिष्ट प्रकारच्या तीन चाकी सायकल तयार करून घेण्यात आल्या असून त्यांच्यावर प्रचाराचे पोस्टर लावून सायकली प्रभागामध्ये फिरवल्या जात आहेत. परराज्यातून आलेले तरुण या सायकली फिरवताना दिसतात.