लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वपूर्ण ठरलेली ‘वॉर रूम’ ही संकल्पना भारतीय जनता पक्षासह अन्य राजकीय पक्षांकडूनही महापलिका निवडणुकीसाठी राबविण्यास सुरुवात झाली आहे. प्रचारसाहित्याच्या निर्मितीपासून मतदार याद्यांपर्यंतची अद्ययावत माहिती ठेवण्यापर्यंत आणि सभा, मेळाव्यांच्या परवानग्यांपासून ते आचारसंहितेची माहिती देण्यापर्यंतची सर्व मदत या ‘वॉर रूम’च्या माध्यमातून उमेदवारांना दिली जात आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत यावेळी ‘वॉर रूम’ ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता असल्याने कमी-अधिक प्रमाणात सर्वच पक्ष ती राबवणार आहेत.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Mallikarjun Kharge criticizes PM Narendra Modi on Ram Mandir Pranpratistha Ceremony
“मी अयोध्येत गेलो तर त्यांना सहन झाले असते का?” काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांचा सवाल
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच पक्ष कार्यालयांमधील कार्यकर्त्यांची लगबगही वाढली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रचारसाहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. कार्यालयांमध्येच या सर्व सुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्यासाठी वॉर रूम ही संकल्पना राबविण्यात येत आहे. समाजमाध्यमातून होणारा प्रचार असो की, प्रचारसाहित्य, जाहीरनाम्याचे प्रकाशन या दृष्टीने या वॉर रूमचे महत्त्व वाढले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी वॉर रूममधील संगणक अभियंते आणि त्यांच्या बरोबर काम करणारे कार्यकर्तेही सज्ज झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून हंगामी पक्ष कार्यालयात स्वतंत्र वॉर रूम सुरू  करण्यात आली आहे. कामाच्या दृष्टीने तेथे सोशल मिडिया, साहित्य निर्मिती आणि वाटप, विविध प्रकारच्या परवानग्यांची माहिती, जाहीरनामा, मतदार याद्यांची माहिती असे विभाग करण्यात आले आहेत. प्रचार साहित्य निर्मिती करताना प्रचार पुस्तिकेची रचना कशी असावी हे निश्चित करण्यात येत असून फेसबुक, ट्वीटर या माध्यमातून शहराच्या समस्या, उपाययोजना, मंत्र्यांच्या छोटय़ा-छोटय़ा मुलाखती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि कार्यालयमंत्री उदय जोशी यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही या संकल्पनेवर आधारित स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून होणारा प्रचार, तसेच पक्षातर्फे आयोजित केले जाणारे मेळावे, बैठका यांची माहिती उमेदवार आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे. काँग्रेसकडून स्वतंत्र आयटी विभाग स्थापन करण्यात आला असून त्याचे काम पक्षाच्या कार्यालयातून चालवले जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यालयात स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.