नोटाबंदी आणि चलनटंचाईच्या काळात डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर केवळ शहरांमध्येच वाढलेला नाही तर ग्रामीण भागातील शेतऱ्यांकडूनही ‘कार्ड पेमेंट’ आणि ‘ऑनलाइन पेमेंट’ या सुविधेचा वापर चांगल्या पद्धतीने होत असल्याचे किसान कृषी प्रदर्शनाच्या नोंदणीतून दिसून आले आहे.

[jwplayer gSSKhmYu]

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Navi Mumbai Municipality Expands Waste Management Scope Introduces waste e Transportation Syste
नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध

किसान मालिकेतील २६ वे कृषिप्रदर्शन पुण्याजवळ आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र मोशी येथे बुधवार (१४ डिसेंबर) पासून सुरू होत आहे. विविध विषयांवरील १० दालने आणि चारशेहून अधिक उद्योगांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनाच्या नोंदणीला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी या प्रदर्शनाच्या नोंदणीसाठी ‘ऑनलाईन पेमेंट’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या सुविधेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

नोटाबंदीमुळे ‘ऑनलाइन पेमेंट’च्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असून आतापर्यंत पाच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ५५ टक्के शेतकऱ्यांनी डेबिट कार्डचा वापर केला आहे, तर १५ टक्के शेतकऱ्यांनी क्रेडिट कार्डचा आणि ३० टक्के शेतऱ्यांनी नेट ट्रान्सफर सुविधा वापरली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात ही सुविधा वापरली असल्याची माहिती प्रदर्शनाचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी दिली.

नोंदणीसाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा वापरण्याबाबत गेली चार वर्षे शेतकऱ्यांना सुविधा देत होतो. यंदाचा प्रतिसाद सर्वाधिक आहे, असेही ते म्हणाले. नोंदणीची सुविधा संकेतस्थळावर तसेच मोबाईल अ‍ॅपवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वनोंदणी करणाऱ्यांना नोंदणी शुल्कात सवलतही आहे.

नोटाबंदीची परिस्थिती तसेच स्मार्ट फोनचा वाढत असलेला वापर तसेच इंटरनेटची उपलब्ध होत असलेली सुविधा आणि जागरुकता यामुळे ई नोंदणीला प्रतिसाद वाढल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.

शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि उद्योजक अशा सर्वासाठी उपयुक्त ठरेल अशी या प्रदर्शनाची रचना करण्यात आली असून या घटकांमध्ये विचारांचे आदान-प्रदान होईल असेही प्रयत्न किसान प्रदर्शनाच्या माध्यमातून केले जाणार आहेत.

प्रदर्शनाला पाच दिवसात एक लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. कृषी, पाणी नियोजन, पशुधन, शेती व लघुउद्योग आदी विषयवार दालने प्रदर्शनात उभारण्यात येत असून प्रत्येक दालनात ते स्टॉल पाहता येतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत भरवले जाणार आहे. चीनच्या पन्नास तसेच तैवान, इटली, इस्राएलमधील कंपन्याही प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

[jwplayer TzwZQwr9]