वाघोली येथे एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाचजणांना २६ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

करण श्रीकांत घुगे (वय २१, रा. हिंगणा, हिंगोली), महेश दत्तात्रय कोरडे (वय २२, रा.पाटस, ता. दौंड), अविनाश विजयकुमार शेळके (वय २५, रा. मसलगा, ता. निलंगा, लातूर), देवव्रत शंतनु माने (वय २२, रा. कर्नाळ, ता. मिरज, सांगली), मारुती ज्ञानोबा जाधव (वय २५, रा. लातूर, सर्व सध्या रा. वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात एकोणीस वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

गेल्या बुधवारी (१९ ऑक्टोबर) करणने तरुणीला महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तो राहत असलेल्या खोलीत नेले. तेथे त्याने तिला धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी करणचे मित्र महेश, अविनाश, देवव्रत, मारुतीने तरुणीला अश्लील संदेश पाठवले. मोबाईलवर आलेले संदेश आणि करणने धमकावून बलात्कार केल्यामुळे तरुणी घाबरली होती. तिने तिच्या बहिणीला या प्रकाराची माहिती दिली. गुरुवारी (२० ऑक्टोबर) तिने पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी तातडीने तपास करून शुक्रवारी (२१ ऑक्टोबर)आरोपी करण, महेश आणि अविनाश यांना ताब्यात घेतले. दरम्यान, तरुणीला अश्लील संदेश पाठवणारे आरोपी देवव्रत आणि मारुती यांनाही अटक करण्यात आली.

पाच आरोपींना शनिवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. पाच आरोपी मित्र आहेत.

करण आणि महेशने तरुणीवर बलात्कार केला तसेच त्यांचे मित्र अविनाश, देवव्रत, मारुती यांनी तिला अश्लील संदेश पाठवले. आरोपींचे मोबाईल जप्त करायचे आहेत. त्याअनुषंगाने तपास करायचा आहे. आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती अ‍ॅड. ए. के. पाचारणे यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने पाचजणांना २६ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.