भावगीतामध्ये शब्दांचे उच्चार, कवितेतील भावार्थ यांना अधिक महत्त्व असते. भावगीत हा शब्दप्रधान गायकीचा आविष्कार असतो याचे भान ठेवून संगीतकार आणि गायकांनी सादर केलेली रचना रसिकांच्या पसंतीस उतरेल, असे मत प्रसिद्ध गायिका शोभा जोशी यांनी व्यक्त केले.
स्वरानंद प्रतिष्ठान आणि वाटवे कुटुंबीयांतर्फे आयोजित ‘नवे शब्द नवे सूर’ या मराठी भावगीतांच्या राज्य पातळीवरील स्पर्धेमध्ये युवा संगीतकार सुहित अभ्यंकर याने सांघिक विजेतेपदासह गजाननराव वाटवे करंडक पटकाविला. शोभा जोशी यांच्या हस्ते त्याला पारितोषिक प्रदान करण्यात आले. शोभा जोशी यांच्यासह संगीतकार चैतन्य कुंटे, कवयित्री डॉ. संगीता बर्वे आणि गायक श्रीपाद उंब्रेकर यांनी अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. अदिती गंधे आणि केतन भाटे यांना सांघिक द्वितीय तर, प्रणव हरदार याने तृतीय क्रमांक मिळविला. मुक्ता जोशी आणि स्वराली जोशी यांनी सवरेत्कृष्ट गायिकेचे पारितोषिक विभागून पटकाविले. युधामन्यू गद्रे हा सर्वोत्तम संगीतकार आणि मयुरेश जोशी हा सर्वोत्तम कवी ठरला.
प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मििलद वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. विजय मागीकर यांनी आभार मानले. उत्तरार्धात ‘मी निरांजनातील वात’ या कार्यक्रमात अभिषेक मारोटकर, शेफाली कुलकर्णी, ऋषिकेश बडवे, श्रुती करंदीकर यांनी गजाननराव वाटवे यांच्या रचना सादर केल्या. वाटवे यांच्या कन्या मंजिरी चुनेकर आणि पुत्र डॉ. मििलद वाटवे यांनी हिंदूी गजला आणि भावगीते सादर केली. शोभा जोशी यांनी वाटवे यांच्या आठवणी सांगितल्या. त्यांना नरेंद्र चिपळूणकर, अमित कुंटे, अंजली सिंगडे-राव यांनी साथसंगत केली.