जबाबदार कार्यकर्त्यांमुळेच केंद्रात एकहाती सत्ता
पक्षातील जुन्यांचा सन्मान राखून नव्यांना संधी दिली पाहिजे, असे मत गोवा-दीव दमणचे भाजपचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. पक्षात जबाबदारीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच कमी कालावधीत आपण केंद्रात एकहाती सत्ता मिळवू शकलो, असेही ते म्हणाले.
पुणे जिल्हा व पिंपरी शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी आळंदीत आयोजित शिबिरात ते बोलत होते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, पिंपरीचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखा ढोरे, शरद ढमाले आदी उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाले,की काँग्रेसमुक्त भारत हे ध्येय साध्य करण्यासाठी भाजपचा भौगोलिक व सामाजिक विस्तार करण्याची गरज आहे. सर्व बूथ समित्यांवर सर्व घटकांना सामावून घेतले पाहिजे. त्या-त्या भागातील समाज लोकसंख्येचा विचार करून सर्व जाती-धर्माला प्रतिनिधित्व दिले पाहिजे. आगामी २५ वर्षे भाजपचे सरकार देशावर राहील, हे ध्येय ठेवून प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्षकार्य केले पाहिजे. बाळा भेगडे यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग ठाकूर व धर्मेद्र खांडरे यांनी स्वागत केले. अविनाश बवरे यांनी सूत्रसंचालन केले.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा