नाल्यामध्ये टाकला जाणारा कचरा आणि अस्वच्छतेमुळे झालेली डासांची बेसुमार वाढ, अशी हिंगणे खुर्द परिसरात डेंग्यूसाठी ‘पोषक’ परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांचे या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार या परिसरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सिंहगड रस्त्याला समांतर जाणारा कॅनॉल रस्ता हा भरपूर लोकवस्ती असूनही पूर्ण दुर्लक्षित आहे. नवनवीन टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. परंतु अंतर्गत रस्ते आणि कचरा या महत्त्वाच्या प्रश्नांकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. दामोदरनगर मागील साईनगर परिसर या भागात सुदत्त संकुल ही नवी वसाहत उभी राहिली आहे. तेथेपर्यंत पोहोचण्याचा रस्ता खराब आणि अरुंद आहे. पण त्याहीपेक्षा तेथे कचरा प्रश्नामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या सोसायटीसमोर पाणी वाहून जाण्यासाठी असलेला मोठा नाला ही कचरा टाकण्याची जागा बनली आहे. त्यामुळे डासांची बेसुमार वाढ झाली आहे आणि आरोग्याच्या प्रश्नाने रौद्र रूप धारण केले आहे. महापालिकेच्या कचरा गाडय़ांची कमतरता हे त्यामागचे कारण आहे, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. हिंगणे खुर्द, दामोदरनगर, साईनगर परिसर घाणीचे साम्राज्य बनत चालला असून डेंगी रोगाला पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. या परिसरातील गंभीर बनत चाललेल्या मूलभूत प्रश्नांकडे पालिकेचे अधिकारी आणि राजकीय पुढारी लक्ष देतील काय, असा प्रश्न या परिसरातील नागरिक विचारत आहेत. डेंग्यू या रोगामुळे एखादा बळी जाईल तेव्हाच या प्रश्नाचे गांभीर्य ध्यानात येईल का, असाही प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
mumbai south central lok sabha constituency marathi news
आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : प्रदूषण, आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावे