इंडस्ट्रीज असोसिएशन, अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार असून विविध विभागातील समन्वयासाठी समन्वयक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतील, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

हिंजवडी आयटी पार्कला भेट देऊन उद्योजक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या बापट यांनी जाणून घेतल्या. उद्योग कंपन्यांची संघटना असलेल्या हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (एचआयए) कार्यालयात विविध शासकीय विभागप्रमुखांची बैठक बापट यांनी आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान पालकमंत्र्यांना एचआयएने प्रमुख पायाभूत सुविधांसह रस्ते, पार्किंग, वाहतूक, सुरक्षा आणि घनकचरा व्यवस्थापन या समस्यांबाबत माहिती दिली. तसेच या समस्या सोडविण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना देखील सुचविल्या. या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून बापट यांनी एक कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकारी विविध विभागांदरम्यान समन्वय ठेवतील. तसेच समस्यांबद्दल दर दोन महिन्यांनी आढावा बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगर नियोजन विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंते श्रीकांत सावने, ज्ञानदेव जुंधारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख, कार्यकारी अभियंते सुधीर नागे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंते प्रवीण किडे, कार्यकारी अभियंते धनंजय देशपांडे, झोन तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वाहतूक पोलीस विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे, उपायुक्त अशोक मोराळे, हिंजवडीचे पोलीस निरीक्षक अरुण वायकर, वाहतूक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्यासह अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. एचआयएचे अध्यक्ष अनिल पटवर्धन, सचिव डॉ. सतीश पै, व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्य कार्यवाहक अधिकारी आणि प्रमुख आयटी कंपन्यांच्या केंद्र प्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत सहभाग घेतला.