मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा गुरूवारी विविध संस्था व संघटनांकडून निषेध नोंदवण्यात आला, तसेच या हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमात महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच संविधानाच्या सरनाम्याचे वाचन करण्यात आले. आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक अशोक येनपुरे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप या वेळी उपस्थित होते. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात काँग्रेस भवनमध्ये अॅड. अभय छाजेड यांच्या उपस्थितीत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी या हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी अशोक कामटे यांच्या घरी जाऊन कामटे परिवाराच्या उपस्थितीत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’तर्फे अॅड. औदुंबर खुने-पाटील व विनायक चाचर, आनंद रिठे, बाबा पाटील, शंकर शिंदे, राजू गिरे, अभिजित बारवकर, ईश्वर मते, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ, शफी महंमद शेख, संजय गाडे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलिस मित्र संघटनेतर्फे मोहन जोशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, बापूसाहेब भिसे, बाबा शेख, चंद्रशेखर कपोते, अजीज सय्यद यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष रवींद्र द्विवेदी, उपाध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव बाबर, निवृत्त पोलिस अधिकारी वसंतराव कोरेकर यांच्या उपस्थितीत हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ