खासगी गोष्टी फेसबुकवर शेअर केल्याने चिडलेल्या पतीने पत्नीची गळा दाबून हत्या करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर येथील शिवसाई फेज एकमध्ये ही घटना घडली असून आयटी कंपनीत काम करणाऱ्या पतीने हा प्रकार केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सोनाली राकेश गांगुर्डे (वय २८), राकेश बाळासाहेब गांगुर्डे दोघेही (वय ३३, रा. शिवसाई अपार्टमेंट, फ्लॅट नं १०४, सोलापूर रोड, हडपसर, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी मृत सोनाली यांचे भाऊ हर्षल महेंद्र पवार (रा. पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. दोघेही मुळचे नाशिकचे असून गत तीन वर्षांपासून ते हडपसर येथे राहण्यास आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली यांच्या आईने बुधवारी दिवसभर सोनाली यांना फोन लावला. मात्र त्यांनी फोन उचलला नव्हता. त्यामुळे त्यांचा भाऊ हर्षल पवार हा रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी गेला. खूप वेळ आवाज दिल्यानंतर काही प्रतिसाद न दिल्याने त्याने दरवाजा तोडून आत पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. पत्नीची हत्या करण्यापूर्वी राकेश गांगुर्डे याने सुसाइड नोट लिहिली होती. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना मूल होत नव्हते. घरातील समस्या आणि कुटुंबनियोजनाबद्दल घेत असलेल्या उपचाराविषयी व्हाट्सअप व फेसबुकद्वारे मित्र-मैत्रिणीला सांगत असल्याच्या कारणावरून आपल्याला राग होता असे, राकेशने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत नमूद केले आहे. सोनाली गांगुर्डे यांनीही बी.ई. पर्यंतचे शिक्षण घेतले होते. मात्र त्या कुठे ही कामाला जात नव्हत्या. तर राकेश गांगुर्डे हे एका खासगी आयटी कंपनीमध्ये कामाला होते. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत. उच्च शिक्षित पतीकडून असा प्रकार झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष