आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत पुण्यातील हडपसर भागात राहणारी हचिंग्स हायस्कूलमधील मुस्कान पठाण कोणतीही क्लास न लावता देशात पहिली आली. पुण्याचे नाव देशात झळकावलेल्या या मुलीला डॉक्टर व्हायचे आहे. देशात पहिला क्रमांक मिळविलेल्या मुस्कानने लोकसत्ता ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. मुस्कान म्हणाली की, शाळेमधून ज्या वेळी फोन आला तेव्हा विश्वास बसत नव्हता. एवढे मार्क मिळून देशात पहिली येईन, असे कधीच वाटले नव्हते. शाळेमध्ये पहिली येईन असा विश्वास होता, पण देशात पहिली अव्वल गुण प्राप्त होतील याचा विचारही मनात आला नव्हता.

नववीच्या इयत्तेतून दहावीत प्रवेश केल्यापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून अभ्यासाला सुरुवात केली. कोणतीही विशेष शिकवणी न लावता घरीच दररोज पाच तास अभ्यास करायचे, असे ती म्हणाली. सध्याच्या घडीला पालक गुणाच्या बाबतीत आपल्या मुलांवर दबाव टाकत असतात हे अनेकदा पाहायला मिळते. या बाबतीत मात्र मुस्कान भाग्यशाली ठरली. तिच्या आई-वडिलांनी चांगले गुण मिळविण्यासाठी तिच्यावर कोणतेही दडपण टाकले नाही. तसेच बोर्डाची परीक्षा असल्यामुळे ताण दिला नाही. आई-वडिलांविषयी मुस्कान म्हणाली की, परीक्षेला सामोरे जाताना अभ्यास कर, एवढे टक्के पडायलाच हवेत, अशी अपेक्षा माझ्या आई-बाबांनी कधीच केली नाही. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. मी कधी चित्रपट, गाणी किंवा खेळायची तेव्हा त्यांनी मला कधीच रागावले नाहीत. दहावीच्या पहिल्या दिवसानंतर बोर्डाची परीक्षेचा बाऊ न करता त्यांनी आतापर्यंतच्या शिक्षणाचा प्रवासासारखीच मोकळीक दिली.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
is it wrong to expect rich husband
‘श्रीमंत नवरा पाहिजे’, अशी अपेक्षा महिलांनी जोडीदाराकडून ठेवणे चुकीचे आहे का?
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

यावेळी आई-वडिलांसोबतच तिने शाळेतील शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण होती, असेही सांगितले. आई-बाबा आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच मी यशाचे शिखर गाठले आहे, असे ती म्हणाली. यावेळी शाळेतील प्रत्येकाने मला मदत केली, हे सांगायलाही ती विसरली नाही. मुस्कानची आई शाकिरा पठाण म्हणाल्या की, दहावीमध्ये गेल्यापासून कधी ही आम्ही तिला अभ्यास कर किंवा तुला एवढे टक्के पडले पाहिजे, असा म्हटले नाही. ती अभ्यासात हुशार होती. पण देशात पहिली येईल, असे कधीच वाटले नव्हते. चांगला अभ्यास केल्यामुळेच तिला यश मिळाले. तिला ज्या शाखेला प्रवेश घ्यायचा त्याचे तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. यापुढे तिच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही.