‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळा उद्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची विद्यार्थ्यांना संधी देणारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळा गुरुवार (२५ मे) आणि शुक्रवार (२६ मे) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘हॉटेल सेंट्रल पार्क’ शिवाजीनगर येथे होणार आहे. बारावीनंतरच्या करिअरबाबत मार्गदर्शन करणाऱ्या या कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे (२५ मे) उद्घाटन पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या हस्ते होणार आहे, तर दुसऱ्या दिवसाचे (२६ मे) उद्घाटन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते होणार आहे. करिअर समुपदेशक विवेक वेलणकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार, डॉ. अभय अभ्यंकर, डॉ. अतुल ढाकणे, नामवंत जाहिरात संस्थेचे संचालक ऋग्वेद देशपांडे, निवेदक डॉ. अमित त्रिभुवन, क्रीडा पत्रकार मिलिंद ढमढेरे या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा दोन दिवस होणार आहे. या दोन्ही दिवशी विषय आणि वक्ते सारखेच असतील. कार्यशाळेसाठी एका दिवसाला ३० रुपये प्रवेशशुल्क असून सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेच्या प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मिळू शकतील. त्याचबरोबर ऑनलाइन नोंदणीही करता येईल. महत्त्वाचे काही * कार्यशाळा कधी होणार- २५ आणि २६ मे, सकाळी ९ ते सायं. ५ * कुठे होणार - हॉटेल सेंट्रल पार्क, बापूसाहेब गुप्ते मार्ग, (जंगलीमहाराज रस्त्याजवळ) शिवाजीनगर * प्रवेशिका शुल्क - एका दिवसाचे ३० रुपये (दोन्ही दिवस वक्ते आणि विषय सारखे असतील) * प्रवेशिका कुठे मिळतील- ‘लोकसत्ता एक्सप्रेस हाउस, १२०५/ ०२़/ ०६ शिरोळे रस्ता (संभाजी बागेसमोरील गल्ली) शिवाजीनगर * प्रवेशिका मिळण्याची वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत * ऑनलाइन नोंदणीसाठी - प्रायोजक ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेसाठी ‘अॅमिटी युनिव्हर्सटिी, मुंबई’ हे टायटल पार्टनर आहेत. ‘विद्यालंकार’ आणि ‘एमआयटी आर्ट डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सटिी, पुणे’ हे असोसिएशन पार्टनर आहेत. सपोर्टेड बाय ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ आणि पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ आणि ‘लक्ष्य अॅकॅडमी, ‘युवर फिटनेस्ट’ हे हेल्थ पार्टनर आहेत.