‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ करिअर कार्यशाळा

मळलेल्या वाटांपलीकडेही करिअरच्या क्षितिजाचा विस्तार आता होऊ लागला आहे. संधी तर अनेक आहेत, परंतु आपल्यासाठी योग्य संधी नेमकी कशी ओळखावी, याची माहिती देणारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा २५ आणि २६ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘हॉटेल सेंट्रल पार्क’ शिवाजीनगर येथे होणार आहे. या कार्यशाळेच्या प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिळू शकतील. सहभागासाठी ऑनलाईन नोंदणीही सुरू आहे.

दहावीनंतर करिअर घडवायचे म्हणजे नेमके काय करायचे, याविषयी प्रसिद्ध करिअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. दहावी-बारावीनंतरच्या संधी तसेच उच्चशिक्षणाच्या वाटा याबद्दलही ते विशेष मार्गदर्शन करतील. वाढती स्पर्धा, अपेक्षा यांमुळे विद्यार्थ्यांवरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वेळी काय केले पाहिजे, याविषयी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार मार्गदर्शन करणार आहेत.

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी गरजेची असलेली ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा, तसेच अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘जेईई’ ही परीक्षा द्यावी लागते. या   परीक्षांमध्ये यश कसे मिळवावे, त्यासाठी अभ्यासाच्या युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतील, डॉ. अभय अभ्यंकर. डॉ. अतुल ढाकणे आजच्या डिजिटल युगात या माध्यमांचा करिअरसाठी कशा प्रकारे वापर करून घ्यावा याची माहिती देतील. जाहिरात क्षेत्रातील संधींबाबत नामवंत जाहिरात संस्थेचे संचालक ऋग्वेद देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. चांगला आवाज ही देखील चांगल्या करिअरची वाट असू शकते. चांगल्या आवाजाच्या शोधात असणारे निवेदन, डिबग, व्हॉइसओव्हर, रेडिओ जॉकी यांसारखे पर्याय प्रसिद्ध निवेदक डॉ. अमित त्रिभुवन उलगडून दाखवतील. खेळाडू म्हणून आपले स्थान निर्माण करण्यापलीकडे क्रीडाक्षेत्रात संघाचे, सामन्यांचे व्यवस्थापन, आहारतज्ज्ञ, पंच किंवा रेफ्री असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यावर क्रीडा पत्रकार मिलिंद ढमढेरे प्रकाश टाकणार आहेत. ही कार्यशाळा दोन दिवस होणार आहे. या दोन्ही दिवशी विषय आणि वक्ते सारखेच असतील. कार्यशाळेसाठी एका दिवसाला ३० रुपये प्रवेशशुल्क असून सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेच्या प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मिळू शकतील. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणीही करता येईल.

प्रायोजक

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेसाठी ‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई’ हे टायटल पार्टनर आहेत. ‘विद्यालंकार’ आणि ‘एमआयटी-आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे’ हे असोसिएशन पार्टनर आहेत. सपोर्टेड बाय ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ आणि पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करीअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ आणि ‘लक्ष्य अ‍ॅकॅडमी’. ‘युवर फिटनेस्ट’ हे हेल्थ पार्टनर आहेत.