रस्त्यावरून जाणाऱ्यांचे मोबाइल हिसकावणाऱ्या दुकलीला अटक, दोन लाखांचे १६ मोबाइल जप्त

स्मार्टफोनवर ‘पोकेमॉन गो’ खेळण्यात दंग असलेल्या तसेच चालताना व्हॉट्स अ‍ॅपवर संदेशाची देवाण-घेवाण करणाऱ्या तरुणांना हेरून चोरटय़ांनी त्यांच्याकडील मोबाइल हिसकाविल्याच्या घटना शहरात उघडकीस आल्या आहेत. अशा प्रकारे मोबाइल चोरणाऱ्या दोन तरुणांना कोथरूड पोलिसांनी पकडले असून त्यांच्या अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे सोळा मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपासून कोथरूड तसेच पौड रस्ता भागात रस्त्याने मोबाइलवर गेम खेळत जाणाऱ्या वा ऑनलाइन असणाऱ्या पादचारी तरुणांचे मोबाइल हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पौड रस्त्यावर एका तरुणीचा मोबाइल तिच्या हातातून हिसकावून नेल्याचीही घटना घडली होती. त्या अनुषंगाने कोथरूड पोलिसांचे पथक चोरटय़ांचा माग काढत होते. चोरटे मोबाइल हिसकाविल्यानंतर भरधाव दुचाकीवरून पसार व्हायचे. त्यामुळे त्यांचे वर्णन देखील पोलिसांना मिळत नव्हते. पोलिसांनी विविध ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पडताळून पाहिले होते. मात्र, चोरटय़ांचा माग काढता येत नव्हता.

पोलिसांचे पथक चोरटय़ांचा माग काढत होते. एका खबऱ्यामार्फत दोन जणांनी मोबाइल हिसकाविण्याचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. अभिजित सुदेश शिंदे (वय १९, रा. नवनाथ मित्र मंडळाजवळ, कोथरूड) आणि विशाल विलास फाटक (वय २१, रा. सुतारदरा, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्या अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी चोरलेले मोबाइल त्यांच्या अल्पवयीन मित्रांकडे दिले होते. पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोळा मोबाइल आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त तुकाराम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड ठाण्यातील पोलिसांनी ही कामगिरी केली.

चोरटय़ांनी वारजे, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, हिंजवडी, पाषाण आदी भागात मोबाइल हिसकाविण्याचे गुन्हे केले आहेत. मोबाइलवर ‘पोकेमॉन गो’ हा गेम खेळणारे तरुण चोरटय़ांनी लक्ष्य केले होते. मोबाइल हिसकावून ते भरधाव दुचाकीवरून पसार व्हायचे. त्यांनी हिसकविलेल्या मोबाइल संचांची विक्री परप्रांतीय मजुरांना अवघ्या एक ते अडीच हजारांत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.  ज्यांचे मोबाइल हिसकाविण्यात आले आहेत, त्यांनी मोबाइलच्या आयएमईआय क्रमांकासह कोथरूड पोलीस ठाण्यात (०२०-२५३९१५१५ किंवा २५३९१०१०) तक्रार करावी.

प्रेम वाघमोरे, पोलीस उपनिरीक्षक, कोथरूड पोलीस ठाणे</strong>