पुण्यातील वारजे परिसरात एका कामगार महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलीला विषारी औषध पाजून तिची हत्या केली. या घटनेनंतर संबंधित महिला फरार झाली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलीला विषारी औषध पाजून तिची हत्या केली. औषध पाजल्यानंतर ही महिला घरातून निघून गेली. साई संजय सवाने असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिचे नातेवाईक संजय साळवे यांना या घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस फरार महिलेचा शोध घेत आहेत.