पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग समाप्तीपूर्वी पाच किलोमीटर अंतरावर रविवारी पहाटे साडेपाच वाजता निखील ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने इनोव्हा व स्वीफ्ट मोटारींना दिलेल्या धडकेत इनोव्हा मोटार आणि बस महामार्गाचा संरक्षित कठाडा तोडून २५ फुट खोल खडय़ात पडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये इनोव्हा व स्वीफ्ट मोटारीमधील प्रवाशांसह बसमधील प्रवाशांपैकी १७ जण ठार व ३५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये १० महिला व ६ पुरूष आणि एका दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. निखील ट्रॅव्हल्स कंपनीची बस साताऱ्याहून बोरीवली येथे जात असताना हा अपघात घडला. जखमींमध्ये लहानग्या तीन मुलांचा समावेश आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर कामोठे येथील एमजीएम, पनवेल येथील गांधी,अष्टविनायक, पॅनासिया आणि वाशी येथील एमजीएम अशा विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये मृत व जखमी हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पनवेल येथील राहणारे आहेत.

रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे येथून मुंबईला येत असताना शिवकर गावाजवळ एक स्वीफ्ट मोटार पंचर झाल्याने स्वीफ्ट मोटारीच्या चालकाने ही मोटार महामार्गाच्या उजव्या बाजुला (पहिल्या लेनवर) उभी करून या मार्गाने जाणाऱ्या इतर वाहनांकडून मदत मागितली. याचदरम्यान या मार्गाने जात असलेल्या इनोव्हा मोटारीचा चालक निखिल पाटील याने मदतीसाठी आपली मोटार थांबवून स्वीफ्ट मोटारीमधील चालकाला पंचर काढण्याचे साहित्य देत असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या निखिल ट्रव्हॅल्स या खासगी बसने स्वीफ्टसह इनोव्हा मोटारींना ठोकर दिली. त्यावेळी इनोव्हा मोटारीत नवी मुंबईतील घणसोली येथे राहणारे दोन तरूण बसले होते.

मृतांची नावे
१) वेदिका यादव (२ वर्षे)
२) श्रद्धा काळे – २० वर्षे
३) अविनाश हनुमंत कारंडे – भांडुप – ३९ वर्षे
४) विलास बाबुराव माने – ६२ वर्षे

जखमींची नावे
१) प्रकाश गायकवाड – रा. कळण
२)अश्विनी योगेश मोहीते – कल्याण<br />३) सुषमा संदीप शिवणकर – रा. सातारा
४) संगीता गोडसे – दिवा
५) संदेश गोडसे – दिवा
६) प्रविण गोपाळ खोपडे – भांडुप
७) जगन्नाथ दळवी – अंधेरी
८) सूनिल डिघे – सातारा
९) ओम तानाजी डिगे – सातारा
१०) रितेश चव्हाण – जोगेश्वरी
११) निलेश नाळे – ठाणे<br />१२) निशा यादव – सातारा
१३) सागर पाटील – घणसोली
१४) विपीन म्हात्रे – घणसोली
१५) सिद्धेश कदम – ठाणे
१६) राज अपनाथ – ठाणे
१७) ओमकार मानगोळी – ठाणे
१८) ओमकार साळुंके – लोणन
१९) अनिता कदम – सातारा
२०) मनोहर बुजावर – सातारा
२१) योगेश खराडे – डोंबिविली
२२) अक्षय गुजर – सातारा
२३) श्रुती शिवतंक – सातारा
२४) सूनिल गोडसे – दिवा
२५) सोनल गोडसे – दिवा
२६) आर्या बाहदपूरे – ठाणे
२७) निर्मा योगेश मोहीते