केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) संकेतस्थळ सुरू होण्यास शनिवारी दिवसभर अडचणी येत असल्यामुळे पहिल्याच दिवशी वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशपरीक्षा (नीट) देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विरस झाला. नीटची प्रवेशपत्रे शनिवारपासून उपलब्ध होणार होती.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशपातळीवर एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष परीक्षेच्या नियोजनात मात्र अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. परीक्षेचे अर्ज भरणे, त्यानंतर केंद्रांवरून झालेला वाद आणि आता प्रवेशपत्रे डाऊनलोड करण्यातही विद्यार्थ्यांना अडचणी येत

byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

आहेत. देशभरात ७ मे रोजी सीबीएसईमार्फत ‘नीट’ घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शनिवारपासून प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येतील असे सीबीएसईकडून जाहीर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी त्यानुसार लॉग इन करून प्रवेशपत्रे डाऊनलोड करण्याचे प्रयत्न केले.

मात्र संकेतस्थळ सुरू न होणे, लॉगीन न होणे अशा अडचणी येत होत्या. दुपारनंतर सीबीएसईकडून संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती देण्यात आली. ‘सव्‍‌र्हरमध्ये बिघाड झाला आहे. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. कृपया थोडय़ा वेळाने पुन्हा प्रयत्न करा,’ असा संदेश सीबीएसईकडून देण्यात आला. http://www.cbseneet.nic.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रे डाऊनलोड करून घेणे अपेक्षित होते.