नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपान येथे आहेत. नेताजी बोस यांची १८ ऑगस्टला पुण्यतिथी आहे. त्यापूर्वी त्यांच्या अस्थी भारतात आणून गंगेत विसर्जन करावे, अशी मागणी ‘इंडो-जपानी फाऊंडेशन फॉर कल्चरल एक्स्चेंज अॅण्ड वर्ल्ड पीस’चे कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख यांनी केली आहे. या मागणीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घ्यावी, अन्यथा देशभरात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी गेली ७१ वर्षे जपानमध्ये आहेत. १८ ऑगस्टला त्यांच्या पुण्यतिथीपूर्वी त्या अस्थी भारतात आणण्यात याव्यात, अशी मागणी ‘इंडो-जपानी फाऊंडेशन फॉर कल्चरल एक्स्चेंज अॅण्ड वर्ल्ड पीस’चे कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख यांनी केली आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सुभाषचंद्र बोस यांचे योगदान मोठे आहे. नेताजींच्या अस्थी गेल्या ७१ वर्षांपासून जपानमध्ये आहेत. त्या अस्थी भारतामध्ये आणून त्यांचे गंगेमध्ये विसर्जन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. बोस यांच्या अस्थी भारतात आणण्यासाठी अनेक वर्षांपासून त्या-त्या केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र त्याची दखल आजपर्यंत घेतली गेली नाही, असा आरोप बाळासाहेब देशमुख यांनी केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी पुढ़ाकार घ्यावा, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, नेताजी बोस यांच्या १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुण्यतिथीपूर्वी त्यांच्या अस्थी भारतात आणून त्यांचे गंगेत विसर्जन करण्यात यावे, अन्यथा देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाळासाहेब देशमुख यांनी  दिला आहे.

misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!