चित्रपट माध्यमाचे विद्यार्थी आणि रसिकांच्या लाडक्या असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील (एनएफएआय) चित्रपटगृहाचा अक्षरश: कायापालट झाला आहे. नवीन आरामशीर खुच्र्या, जमिनीवर नवीन मऊ कार्पेट आणि आवाजाच्या अधिक चांगल्या अनुभवासाठी ‘डॉल्बी ७.१’ तंत्रज्ञान यांच्यासह या चित्रपटगृहात प्रेक्षकांना मल्टिप्लेक्ससारखा अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे लवकरच या चित्रपटगृहात ‘डिजिटल सिनेमा प्रोजेक्टर’ (डीसीपी) उपलब्ध करण्याचा विचार असून त्याद्वारे अधिक चांगल्या दर्जाचे प्रदर्शन शक्य होईल.एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली.
विधी महाविद्यालय रस्त्यावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे ३३० प्रेक्षक बसू शकतील असे चित्रपटगृह आहे. या ठिकाणी या सुधारणा करण्यात आल्या आहेत. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे (एफटीआयआय) तसेच इतर संस्थांत शिकणारे चित्रपट व टीव्ही माध्यमाचे विद्यार्थी आणि चित्रपट रसिकांचा येथे राबता असतो. या चित्रपटगृहातील खुच्र्या आणि कार्पेट पूर्णत: बदलल्यामुळे  ‘लुक’ पुरता पालटला आहे. तसेच ध्वनिक्षेपणासाठीचे आधुनिक ‘डॉल्बी ७.१’ तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे चित्रपट पाहताना आणखी चांगला अनुभव मिळणार आहे.
सध्या चित्रपट प्रदर्शनासाठी या चित्रपटगृहात ३५ एमएम प्रोजेक्टर तसेच ‘डीएलपी प्रोजेक्टर’ (डिजिटल लाइट प्रोसेसिंग) उपलब्ध आहेत. तसेच जुन्या काळच्या काही चित्रपटांसाठी प्रदर्शनासाठी लागणारे १६ एमएम आणि ८ एमएम क्षमतेचे प्रोजेक्टर देखील या ठिकाणी आहेत. नवीन चित्रपट डिजिटल माध्यमात बनवले जात असल्यामुळे आता या चित्रपटगृहात ‘डीसीपी’ प्रोजेक्टर घेण्यात येणार आहे. एनएफएआयच्या कोथरूडमधील २०० प्रेक्षक क्षमतेच्या नवीन चित्रपटगृहातही असाच प्रोजेक्टर बसवला जाईल. मगदूम म्हणाले, ‘चित्रपट संग्रहालयाकडे चित्रपट प्रदर्शनाचे प्रत्येक माध्यम उपलब्ध असावे या उद्देशाने डीसीपी प्रोजेक्टर देखील घेण्यात येणार आहे. यासंबंधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रोजेक्टरच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया होईल. चित्रपटगृहात डॉल्बी ७.१ तंत्रज्ञान उपलब्ध झाले असले, तरी आवाजाच्या प्रक्षेपणासाठीची ‘मोनो साउंड ट्रॅक’ ही जुनी पद्ध देखील उपलब्ध आहे. काही जुन्या चित्रपटांसाठी हे जुने तंत्रज्ञानही लागते.’ विधी महाविद्यालय रस्त्यावरील चित्रपटगृहात ४० लोक बसू शकतील असे एक लहान चित्रपटगृह देखील आहे. या ठिकाणची ध्वनी व्यवस्थाही बदलण्यात येणार असल्याचे मगदूम यांनी सांगितले.
सापडताहेत एकाहून- एक जुन्या चित्रफिती
एनएफएआयला नुकतीच हैदराबादमध्ये ‘पल्लनाटी युद्धम्’ या तेलुगू चित्रपटाची फिल्म मिळाली आहे. ही जुनी नायट्रेट फिल्म असून ती चेन्नईला चित्रपट प्रयोगशाळेत प्रक्रियेसाठी पाठवण्यात आली आहे. एल. व्ही. प्रसाद यांची निर्मिती असलेल्या चित्रपटात अभिनेते नागार्जुन यांचे पिता अकिनिनी नागेश्वर राव यांनी अभिनय केला आहे. चित्रपट रसिकांकडेही जुन्या चित्रफिती, पोस्टर्स किंवा चित्रपट माध्यमाशी संबंधित संग्राह्य़ साहित्य असल्यास त्यांनी एनएफएआयशी संपर्क साधावा, असे प्रकाश मगदूम यांनी सांगितले.   

Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा