महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुढाकार

शतकाहून अधिक काळ ग्रंथांची जपणूक करणाऱ्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतील शंभर वर्षांपूर्वीपासूनचे एक हजार ग्रंथ लवकरच मराठी विकिपीडियावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे एक कळ दाबताच जगभरातील अभ्यासक, संशोधक आणि वाचकांना जुन्या कालखंडातील दुर्मीळ आणि मौलिक माहिती उपलब्ध होणार असून, ग्रंथोत्तेजक संस्थेच्या ग्रंथांमुळे विकिपीडियाचे दालनही समृद्ध होणार आहे.

Indian Railway facts
रेल्वे इंजिनवर लिहिलेल्या ‘या’ शब्दांच्या मदतीनं ओळखा गाडी कोणती आहे? कोडमध्ये दडलेली असते खास माहिती
pune marathi news, computer engineer young girl crime marathi news
विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाखांची फसवणूक
Your name is not in the voter list
विश्लेषण : मतदार यादीत तुमचं नाव नाही? मग हा लेख वाचा आणि तयारीला लागा
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व

काही संदर्भ, माहिती हवी असल्यास ‘गुगल’ किंवा विकिपीडिया हे माहितीचा स्रोत म्हणून युवा पिढीचे हक्काचे स्थान झाले आहे. विकिपीडियावरील माहिती ही एक तर इंग्रजीमध्ये आणि तीही काही प्रमाणात तुटपुंजी किंवा बिनचूक असेल याची शाश्वती देता येत नाही. प्रत्येक वेळी हवी ती माहिती विश्वासार्हतेसह मिळेलच याचा भरवसा देता येत नाही. आता महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या पुढाकारामुळे ही अडचण दूर होणार आहे.

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था व बेंगळुरू येथील सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस) या संस्थांमध्ये नुकताच एक करार झाला आहे. ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. प्र. ल. गावडे आणि सहकार्यवाह डॉ. अविनाश चाफेकर यांनी, तर सीआयएसचे तन्वीर हसन आणि अभिनव गारुळे यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे.

ग्रंथोत्तेजक संस्थेकडे सव्वाशे वर्षांपूर्वीची कागदपत्रे, पेशवे रोजनिशा (पेशवे दफ्तर) आणि सुमारे सात हजारांहून अधिक संख्येने ग्रंथसंपदा आहे. संस्थेतील कागदपत्रे व ग्रंथ जीर्ण झाल्यामुळे ते प्रत्यक्ष हाताळण्यापेक्षा इंटरनेटवर पाहणे आणि वाचणे अधिक सुलभ होईल, या उद्देशातून या ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्याचे काम महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे (एमकेसीएल) करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होताच ग्रंथ मराठी विकिपीडियावर उपलब्ध करून देण्याचे काम सीआयएस करणार आहे.

पेशवे दफ्तर

छत्रपती शाहूमहाराज गादीवर आले, तेव्हापासून खडकीच्या लढाईपर्यंत म्हणजे सुमारे ११० वर्षांचा मराठेशाहीचा इतिहास पेशवे दफ्तरी पाहावयास मिळतो. या काळात महाराष्ट्राची सामाजिक-आíथक आणि धार्मिक स्थिती, लोकांची करमणुकीची साधने, राज्यव्यवस्था, शेतसाऱ्याची आकारणी आणि वसुली, मिठावरील कराविषयी माहिती, सरकार कर्ज, दिवाणी आणि फौजदारी खटले, पोलीस, टपाल, टांकसाळ, धर्मादाय, रस्ते, औषधोपचार या सुविधांची व्यवस्था कशी होती, याविषयी विश्वसनीय माहिती ही पेशवे दफ्तरी मिळते.

विकिपीडियावर काय असेल?

* संस्थेच्या संग्रहातील १८९४ पासूनची मराठी ग्रंथांची विद्वानांनी केलेली परीक्षणे

* शंभर वर्षांपूर्वीपासूनची हस्तलिखिते आणि दुर्मीळ ग्रंथ

* पेशवे दप्तर

* विविध ३२ प्रकारचे कोश

* जुन्या पोथ्या

* न्या. रानडे यांचा ‘राइज ऑफ मराठा पॉवर’ हा ग्रंथ