आप्तेष्ट, नातेवाईक, जवळचा मित्र किंवा एखाद्या विशेष व्यक्तीचे अंत्यदर्शन हा बहुतांश लोकांच्या भावनेचा विषय! काही कारणामुळे जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधीला हजर राहता आले नाही तर त्याची सलही मनात राहते. आता ही सल काही प्रमाणात कमी करता येणार आहे, कारण जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधीचे ऑनलाईन दर्शन घेणे शक्य होणार आहे.. त्यासाठी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत छायाचित्रणाचे खास कॅमेरे बसवून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हे दर्शन इंटरनेटद्वारे घेता येणार आहे.
पुणे महापालिकेच्या सहकार्याने पुण्यातील निनाद संस्थेने ‘रज्जूचक्षू’ या योजनेअंतर्गत ही व्यवस्था केली आहे. यामुळे परदेशात असलेल्या नातेवाईकांना व आप्तेष्टांनाही या योजनेचा उपयोग होणार आहे. ‘गुगल क्रोम’च्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. निनाद संस्थेचे कार्याध्यक्ष उदय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पाला नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजता राज्यमंत्री दिलीप कांबळे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा विभागाचे सहसंघचालक सुहासराव पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
पुण्यातल्या नागरिकांचे आप्त, नातेवाईक, मित्र अशा जवळच्या व्यक्ती परदेशात असण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर इच्छा असतानाही अंत्यविधीला उपस्थित राहता येत नाही, तर काहींना इतर कारणांमुळे ते शक्य होत नाही. अनेकांच्या मनात ही सल कायम राहते. त्यांनाही अंत्यविधीचे दर्शन घेता यावे यासाठी मिळावे किंवा ते नंतर पाहता यावे, हा या प्रकल्पामागचा हेतू आहे. त्यासाठी केवळ २५ हजार रुपये इतका खर्च आला आहे. या प्रकल्पाची दर महिन्याला संस्थेद्वारे देखभाल केली जाणार आहे. त्याच्या चित्रिकरणाची व्यवस्थाही २४ तास सुरू राहणार आहे. ही सोय वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीवर होणाऱ्या अंत्यविधीसाठीच असेल. प्रत्यक्ष अंत्यविधीच्या क्रियाकर्माचे चित्रीकरण केल्यानंतर ते पुढील पाच दिवसांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून पाहणे शक्य होणार आहे. इंटरनेट बंद असल्यामुळे नागरिकांना ऑनलाईन अंत्यविधी पाहता आला नाही, तर हे चित्रीकरण पेन ड्राईव्हमधे दिले जाणार आहे. हे सर्व पाहण्यासाठी इंटरनेटवर वेबसाईट दिली असून त्यात युझर आयडी  ninad) व पासवर्ड (ninadpune) टाकून हा विधी पाहता येईल, असे जोशी यांनी सांगितले.

अंत्यविधी कसा पाहायचा?
आपल्या संगणकावर  googlecrom/ieही साईट उघडा.
त्यामध्ये  http://www.rajjuchaxu.ddns.neही वेबसाईट टाका.
आपल्यासमोर एक पेज येईल. त्यात दिलेला युझर आयडी (ninad) व पासवर्ड (ninadpune) टाका.
त्यानंतर एक विंडोज उघडेल. त्यामध्ये आलेल्या प्लग इनवर क्लिक करा व रन करा.
त्यानंतर डाव्या बाजूस आलेल्या कॅमेरा नंबरवर दोनवेळा क्लिक करा.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता