राज्याचे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी आपल्या मुलाच्या लग्नाला जोडून शिक्षण अधिकाऱ्यांची पन्हाळ्यावर बोलावलेली बैठक व कार्यशाळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे साहेबांच्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त गाठायचा असेल तर अधिकाऱ्यांना आता सरकारी खर्चाने नव्हे, तर स्वत:च्या खिशातून खर्च करून जावे लागणार आहे. या बैठकीचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच शिक्षण संचालकांच्या आदेशाने सहसंचालक दिनकर पाटील यांनी ही बैठक पुढे ढकलल्याचे आदेश काढले.
२८ व २९ एप्रिलची ही कार्यशाळा आणि जाधव यांच्या मुलाच्या लग्नाची तारीख जोडून असल्याच्या योगायोगाबाबत काही अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता.