तयार तूप, लोणी आणि चीज खरेदी करताना गोवर्धनतूप आणि गोचीज आपल्या ओळखीचे झाले आहे. या दोन्ही ब्रँड्सचे उत्पादन करणारी पराग मिल्क फूड्सही कंपनी मूळची पुण्याची आहे हे मात्र माहीत नसते. पुण्यातील शहा कुटुंबाने चोवीस वर्षांपूर्वी सुरू केलेला दुग्धव्यवसाय वाढला आणि त्यांची उत्पादने केवळ देशभरातच नव्हे, तर ३१ देशांमध्ये पोहोचली.

तूप, लोणी, दही, चीज या वस्तू आता घराघरांत विकत आणल्या जातात. दुग्धजन्य पदार्थामधील ‘गोवर्धन’ आणि ‘गो’ हे परिचयाचे झालेले ‘ब्रँड्स’ आणणारी ‘पराग मिल्क फूड्स’ ही कंपनी मूळची पुण्याची आहे.

girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
Mumbai is to be developed as a single whole city Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
मुंबई एकच, संपूर्ण शहराचा विकास करायचा आहे; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल
Narendra Modi
‘चारसौ पार’चा नारा देणारे नरेंद्र मोदी इंडिया आघाडीला घाबरले, अक्कलकोटमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू

देवेंद्र शहा, प्रीतम शहा आणि पराग शहा या बंधूंनी १९९२ मध्ये हा व्यवसाय सुरू केला. खरे तर शहांचा मूळचा व्यवसाय दूधदुभत्याचा नव्हे तर गुरांच्या खाद्याचा होता. त्यामुळे दूधविक्रेत्या शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क होता. दुग्धव्यवसाय जवळपास ८० टक्के असंघटित, तर २० टक्केच संघटित स्वरूपात चालतो. वीस वर्षांपूर्वीही सहकारी दुग्धव्यवसायच मोठय़ा प्रमाणावर चालत असे. त्या वेळी ज्या दिवशी ‘मिल्क हॉलिडे’ पाळला जाई तेव्हा शेतकऱ्यांकडील त्या दिवसाचे दूध पडून राहात असे आणि ते विकले न गेल्यामुळे वायाही जात असे. त्यातच शहा यांना दुग्धव्यवसायाची संधी दिसली आणि ज्या दिवशी पुण्याच्या आसपासच्या भागातील शेतकऱ्यांकडून दूध उचलले जात नसे त्या दिवशी शहा ते गोळा करू लागले. जवळपास वीस हजार लिटर दूध तेव्हा त्यांच्याकडे जमा होत होते. दूध पिशव्या आणि दुधावर प्रक्रिया करून दूध पावडर तयार करण्यापासून शहांनी पुण्यातच सुरुवात केली. ही ‘स्किम मिल्क पावडर’ परदेशात पाठवली जात असे. आज पुण्याजवळील मंचरबरोबर आंध्र प्रदेशमधील पलमनेरमध्येही ‘पराग मिल्क’चा दूध प्रक्रिया प्रकल्प आहे. या ठिकाणी आता दररोज २० लाख लिटर दुधावर प्रक्रिया होऊ शकेल इतकी क्षमता त्यांनी विकसित केली आहे.

‘गोवर्धन’ हा ‘ब्रँड’ १९९६ च्या सुमारास सुरू झाला. त्यात गाईच्या दुधापासून तूप आणि लोण्याची निर्मिती केली जात असे. उत्पादने परदेशी पाठवली जात असल्यामुळे त्याला आधारभूत ठरावा म्हणून ‘पराग मिल्क’ने मंचरलाच ‘भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म’ सुरू केले. आज त्या ठिकाणी दोन हजार ‘होलस्टिन फ्रिजिअन’ गाई असून प्रकल्पाची रोजची दूध उत्पादन क्षमता २५ हजार लिटर आहे. हे दूध कंपनी २०११ पासून ‘प्राईड ऑफ काऊज’ या ‘ब्रँड’खाली विकते. ‘डेअरीतून ग्राहकाच्या दारात’ अशा ‘प्राईड ऑफ काऊज’ या ब्रँडमध्ये कोणत्याही वितरकांची मदत न घेता दुधाचे वेष्टनीकरण आणि ग्राहकापर्यंतचा पुरवठा कंपनीच करते. पुणे, मुंबई आणि सूरतमध्ये हे दूध पुरवले जाते. गाईचे ताजे दूध लवकरात लवकर ग्राहकाला उपलब्ध करून देणे अशी ही संकल्पना आहे. अर्थात त्याची किंमतही नेहमी आपण घेतो त्या दुधापेक्षा अधिक आहे. ‘गो’ हा ‘ब्रँड’ २०१० मध्ये सुरू झाला आणि ‘गोवर्धन’ ब्रँडखाली तूप, लोणी, दही, पनीर आणि ‘गो’ ब्रँडखाली चीज, योगर्ट, फ्रेश क्रीमसारखे परदेशी पद्धतीचे दुग्धजन्य पदार्थ, अशी वर्गवारी करण्यात आली. त्यानंतर २०१३ मध्ये ‘फ्लेवर्ड मिल्क’सारख्या दुग्धजन्य पेयांसाठी ‘टॉप अप’ हा ब्रँडही आला.

देशांत  ‘पराग मिल्क’च्या उत्पादनांचे तीन हजार वितरक आहेत, तर ३१ देशांमध्ये ही उत्पादने पाठवली जातात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये २४०० खेडय़ांमधील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांकडून दूध घेतले जाते. यापुढे चीजच्या व्यवसायावर अधिक लक्ष देण्याचा ‘पराग मिल्क’चा विचार आहे. सध्या ‘गो’ चीजचे सर्व उत्पादन मंचरला होते. साठ मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प आहे.

व्यवसायात टिकून राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी नवीन प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ आणणे ‘पराग मिल्क’ला महत्त्वाचे वाटते. त्यांनी नुकतेच चीजमध्ये ‘स्पाईस अप’ नावाचे एक उत्पादन आणले. त्यात ‘स्लाईस्ड चीज’मध्ये वेगवेगळ्या स्वादांचे चीज पुरवले जाते. उत्पादनांवर शंभर टक्के गाईचेच दूध वापरले जात असल्याचा टॅग हे ‘पराग’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल.

उत्पादनांमध्ये वेगळा विचार करणारा आणि देशात चांगला जम बसवत परदेशातही पोहोचलेला दुग्धजन्य पदार्थामधील ‘ब्रँड’ म्हणून ‘पराग फूड्स’ वेगळा ठरतो.

sampada.sovani@expressindia.com