पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर काही तगडे उमेदवार काठावर पास झाले अशी स्थिती पाहायला मिळाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

प्रभाग ५ ड – अजित गव्हाणे, राष्ट्रवादी ——– विजयी
भाजप आमदार महेश लांडगे यांना धक्का. सख्खे भाऊ सचिन लांडगे यांचा पराभव. राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे यांचे निकटवर्तीय अजित गव्हाणे यांचा विजय.

प्रभाग ८ ड – विक्रांत लांडे, राष्ट्रवादी ——–विजयी
भाजप आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना धक्का. जगतापांचे राईट हॅन्ड सारंग कामतेकर यांचा पराभव. राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडेंचा विजय.

प्रभाग १० क – मंगला कदम, राष्ट्रवादी ——विजयी
सभागृह नेत्या आणि माजी महापौर मंगला कदम यांचा निसटता विजय. भाजपाच्या उमेदवार सुप्रिया चांदगुडे यांची कडवी झुंज.

प्रभाग १३ क – सुमन पवळे, राष्ट्रवादी  —— विजयी
माजी स्थायी समिती अध्यक्षा सुमन पवळे यांनी शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे सह विद्यमान मनसे नगरसेविका अश्विनी चिखले-मराठे आणि विद्यमान नगरसेविका संगीत पवार यांचा दारुण पराभव.

प्रभाग १३ ड – सचिन चिखले, मनसे —– विजयी
शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी मनसे ची राखली लाज. सलग दोन वेळा नगरसेवक राहिलेले राष्ट्रवादीचे तानाजी खाडे यांचा पराभव.

प्रभाग २० ड – योगेश बेहल, राष्ट्रवादी —- विजयी
माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर योगेश बेहल यांनी त्यांचे कट्टर विरोधक यशवंत भोसले यांचा पराभव केला. भोसले हे निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झाले होते.

प्रभाग २१ क – उषा वाघेरे, राष्ट्रवादी —— विजयी
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सत्ता घालवली मात्र त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांना निवडून आणत, लाज राखली. उषा वाघेरे यांनी भाजपच्या माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी, राष्ट्रवादीच्या बंडखोर विद्यमान नगरसेविका सुनीता वाघेरे यांचा पराभव केला.

प्रभाग २१ ड – हिरानंद आसवानी, राष्ट्रवादी —– विजयी
विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष हिरानंद आसवानी यांनी त्यांचे चुलत बंधू भाजप उमेदवार धनराज आसवानी यांचा पराभव केला. अनेक वाद-विवादांमुळं ही लढाई बरीच चर्चेत राहिली.

प्रभाग २४ ड – निलेश बारणे, राष्ट्रवादी —-विजयी
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना अनेक धक्के बसले असताना पुतण्या निलेश बारणे यांना निवडून आणत, त्यांनी लाज राखली.

प्रभाग २५ क – राहुल कलाटे, शिवसेना —–विजयी
शिवसेना शहराध्यक्ष राहुल कलाटे यांनी त्यांच्या सह प्रभागातील तिघांना निवडून आणत, गड राखला. मात्र सिंह गमावला.

प्रभाग २६ ब – सचिन साठे, काँग्रेस —-पराभव
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे हे स्वतः तर पराभव झालेच. मात्र त्यांना पक्षाचे खाते ही उघडता आले नाही. स्थापने पासून सत्तेत असणारी काँग्रेस २००२ पासून सत्तेत नव्हती, २०१७ मध्ये मात्र खातं ही न उघडण्याची त्यांच्यावर नामुष्की ओढवली.

प्रभाग २९ ब – शकुंतला धराडे, राष्ट्रवादी —- पराभव
विद्यमान महापौर शकुंतला धराडे यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांना मोठा धक्का. सत्तेसह महापौर धराडे यांना पराभव स्वीकारण्याची नामुष्की. भाजप उमेदवार उषा मुंडे यांचा विजय.

प्रभाग ३१ ड – नवनाथ जगताप, अपक्ष —-विजयी (भाजप बंडखोर)
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक नवनाथ जगताप यांनी बंडखोरी करत, स्वतःचे चुलत काका आणि भाजप उमेदवार राजेंद्र जगताप यांचा पराभव केला. आता नवनाथ भाजपात प्रवेश करणार आहेत.

प्रभाग ३२ ड – हर्षल ढोरे, भाजप ——–विजयी
भाजप उमेदवार हर्षल ढोरे यांचा शितोळे बंधूंच्या भांडणाचा लाभ झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल शितोळे आणि राष्ट्रवादीचे बंडखोर प्रशांत शितोळे या दोन्ही माजी स्थायी अध्यक्षांना पराभव.