कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आल्यामुळे बहुचर्चित ठरलेल्या कसबा पेठ-सोमवार पेठ या प्रभागातील लढतीमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे गटनेता गणेश बीडकर यांना पराभूत केले. महापालिका निवडणुकीत भाजपची लाट असताना पक्षाच्याच बालेकिल्ल्यात धंगेकर यांनी गणेश बीडकर यांना पराभूत करण्याचा करिश्मा घडवला. धंगेकर यांनी बीडकर यांचा तीन हजार ७०० मतांनी पराभव केला.

eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
What Satej Patil Said?
सतेज पाटील यांचा हल्लाबोल, “भाजपा देशपातळीवर २१४ जागांच्या वर जात नाही, कार्यकर्त्यांना गाजर..”
cm eknath shinde hatkanangale lok sabha marathi news
हातकणंगलेच्या उमेदवारीवरून शिंदेसेनेतील मतभेद चव्हाट्यावर; उमेदवारीत बदल नाही, माने यांचा विश्वास
Sanjay Raut ANI
संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “सांगलीतून कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल..”

महापालिका निवडणुकीच्या निकालांना सुरुवात झाल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या प्रभागातील मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासूनच धंगेकर यांनी एक हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. तेथेच धंगेकर यांचा विजय निश्चित झाला होता. सर्व पाच फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर धंगेकर यांनी बीडकर यांचा तीन हजार ७०० मतांनी पराभव केला.

महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाल्यापासूनच सर्वाचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित कसबा पेठ-सोमवार पेठ या प्रभागाकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते. एकमेकांचे कट्टर राजकीय स्पर्धक असलेले बीडकर आणि धंगेकर हे एकाच प्रभागात ड गटातून समोरासमोर आले होते. या लढतीला काही राजकीय संदर्भही होते. प्रभागांची रचना झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असलेल्या धंगेकर यांनी भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न खासदार संजय काकडे यांच्या माध्यमातून केला होता. त्याला बीडकर आणि पालकंत्री गिरीश बापट यांनी विरोध केला होता. धंगेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे बापट आणि काकडे आमने-सामने आले होते. धंगेकर पक्षात आल्यास राजकीय कारकिर्दीला आव्हान निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेऊन हा विरोध सुरू झाला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वीपासूनच ही लढत चर्चेची ठरली होती. त्यानंतर धंगेकर यांचा भाजपप्रवेश रोखण्यात आला.

भाजपमध्ये विरोध झाल्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून त्यांना या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे अस्लम बागवान यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे धंगेकर यांची काँग्रेसची उमेदवारी धोक्यात आली. धंगेकर यांच्यासाठी बागवान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गोंधळामुळे धंगेकर यांना अपक्ष म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते.

‘मी जनतेचा नगरसेवक’

भाजपच्या लाटेतही मतदारांनी माझ्या कामावर विश्वास दाखविला. मी जनतेचा नगरसेवक आहे. त्यामुळे लोकांची सेवा आणि कामे करीत राहीन, अशी प्रतिक्रिया धंगेकर यांनी विजयानंतर व्यक्त केली.

१८ ४२६ मते रवींद्र धंगेकर

१४२३० मते गणेश बीडकर