पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले तोडफोडीचे सत्र काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाढत्या गुन्हे प्रकारात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक आहे. तोडफोड करणाऱ्या आणि खुलेपणाने तलवारी, कोयते यासारखी हत्यारे घेऊन मिरवणाऱ्या ‘उगवत्या भाईमंडळीं’चा बंदोबस्त पोलिसांकडून होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
शुक्रवारी थेरगावात दोन गटातील वादातून रस्त्यावर लावण्यात आलेल्या २५ हून अधिक मोटारी फोडण्यात आल्या. या वेळी तोडफोड करणाऱ्यांकडे धारदार शस्त्रे होती. त्यांनी प्रचंड धुडगूस घातला. त्याआधी, एक जूनला प्राधिकरणात रस्त्यावर लावलेल्या २२ मोटारी तीन गुंडांनी फोडल्या. ते आरोपी दारू पिलेले होते. अशा तोडफोडीच्या गेल्या दोन वर्षांतील घटनांचा आढावा घेतला असता, या मंडळींना पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. थेरगावातच डांगे चौकात वाहनांवर दगडफेक, भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत राडा, चिंचवड स्टेशनला आनंदनगरमध्ये महामार्गावरच तोडफोड, संभाजीनगर-शरदनगरात दहा मोटारींचे नुकसान, िपपरीतील भाटनगरमध्ये दोन गटातील वादंगातून वाहनांची तोडफोड, काळेवाडीत चार चाकी मोटारींची तोडफोड, अशी मोठी यादी आहे. शहरातील राडेबाजी कमी होती म्हणून की काय, खडकीतही शनिवारी रात्री असाच धुडगूस घातला गेला.
अशाप्रकारच्या घटनांमध्ये अल्पवयीन आरोपींचा सहभाग असतो आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ही भाईमंडळी धारदार शस्त्रांचा वापर करत असतात, हे वेळोवेळी उघड झाले आहे. या स्वयंघोषित भाईमंडळींची तसेच त्यांच्या ‘गॉडफादर’ची माहिती पोलिसांना असते. मात्र, तरीही त्यांच्याकडून ठोस कारवाई केली जात नाही. त्याचा परिणाम म्हणूनच तोडफोड करणे, वाहने जाळणे, खुलेपणाने हत्यारे घेऊन फिरणे यासारखे प्रकार कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत.

 

Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार