पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे बांधकाम व्यावसायिकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली आहे. गोळीबारात बांधकाम व्यावसायिक जखमी झाला आहे. योगेश शेलार असं बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील तुळजा भवानी मंदिरात सकाळी अकराच्या सुमारास योगेश शेलार दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन मंदिराबाहेर येताच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शेलार यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांची त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी शेलार यांच्या पायाला लागली. जखमी झाल्याने त्यांना तातडीने औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेलार यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. शेलार यांच्यावर ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण नेहमीच गजबजलेले असते. तसंच हाकेच्या अंतरावर पोलीस चौकीही आहे. दरम्यान, शेलार यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित होता हे स्पष्ट झाले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Bloodshed because of professional competition in Gondia Sand businessman killed in firing
गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात; गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल