प्रेम हे प्रेम असतं….तुमचं आमचं सेम असतं या कवितेतून मंगेश पाडगावकर यांनी प्रेमाबद्दल बरच काही सांगितलं आहे. याच प्रेमाने अनेकांचे संसार उद्धवस्त केले आहे. तर अनेक मुलांना आईच्या प्रेमापासून पोरकं केलं आहे. मात्र हेच प्रेम मर्यादे पलीकडे गेल्यानंतर काय होऊ शकते, याचं ज्वलंत उदाहरण पिंपरी चिंचवडमधील दिघी येथे पाहायला मिळाले. आईच्या कुशीत वाढलेल्या अवघ्या साडेचार वर्षांच्या पूजाला आता आईविना पूर्ण आयुष्य काढण्याची वेळ आली आहे.

दिघी येथे प्रेमप्रकरणातून हत्या करत आत्महत्या करण्याचा प्रकार मागील आठवड्यात घडली होती. ओम उर्फ पद्माकर साबळे (वय २५) आणि सपना सुरेश भले (वय २४) अशी प्रेम प्रकरणातील मृत व्यक्तींची नावे आहेत. ही घटना दि. ६ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली होती. मयत सपना ही पूजाची आई आहे. काही वर्षांपूर्वी सुरेश भले आणि सपना यांचा विवाह मोठ्या थाटामाठात झाले होते. सुरेश यांना सपनाच्या लग्नापूर्वीच्या प्रेमप्रकरणाविषयी माहिती नव्हती. याचाच फटका लग्नानंतर बसला.

सुरेश आणि सपना यांचा संसार छान चालला होता. त्यांना एक गोंडस मुलगी देखील झाली होती, मात्र लग्ना अगोदर सपनाचे ओम साबळे यांच्यातील प्रेमसंबंध लग्नानंतर पुन्हा बहरले. ओम हा सपनाला अधून मधून भेटायचा. याची माहिती सुरेश यांना तीन महिन्यांपूर्वीच समजली होती. त्यामुळे त्यांनी ओम साबळे यांच्या दाजी आणि त्याच्या कुटुंबीयांना या विषयी कल्पना देण्यात आली. मात्र त्यांचं हे प्रेमप्रकरण सुरूच राहिलं आणि अखेर दि. ६ मे रोजी सुरेश भले घरात नसताना ओम सपनाला भेटायला आला. त्याने चिमुकली पूजाला जाण्यास सांगून सपनाची हत्या करून स्वत: आत्महत्या केली. या घटनेमुळे एका साडेचार वर्षांच्या निरागस पूजाला आपली आई गमवावी लागली. भले कुटुंबीयही या घटनेमुळे उद्धवस्त झाले आहे. या घटनेचा तपास दिघीचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. भुजबळ हे करत आहेत.

नेहमीच आपल्याला अगदी लहानपणापासून आईविषयी प्रेमाची आणि आपुलकीची भावना असते. मात्र या घटनेने असं दाखवून दिले की प्रेमामुळे पूजाला तिचे आयुष्य हे आईविना काढावं लागणार आहे. अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. मात्र ही घटना ह्रदयाला स्पर्श करणारी आहे. जरी तिच्या वडिलांनी तिचं पालनपोषण केले तरी देखील वडील हे आई होऊ शकणार नाहीत. त्यामुळे प्रेम करताना प्रेमवीरांनी थोडा विचार करावा, असेच या घटनेने सर्व समाजाला संदेश दिला आहे. तरी या पुढे लग्नाआधीच्या प्रेम संबंधावर जरब घाला. नाहीतर ही घटना तुमच्याबाबतही घडू शकते, आणि असल्या कित्येक चिमुकल्या पुजाला आईविना जगावं लागेल.