पुणे महापालिकेच्या २०१७-१८ या वर्षासाठीचा ५ हजार ६०० कोटींचा अर्थसंकल्प आज आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसाधारण करात १२ टक्के आणि पाणीपट्टी करात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे करबोजाने पुणेकरांचे कंबरडे मोडणार आहे.

या वेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. येत्या काळात स्थायी समितीमार्फत या अंदाजपत्रकात काही प्रमाणात बदल करून अंतिम अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येईल.

अर्थसंकल्पात काय?

कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पिंपरी सांडस, मोशी येथील जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ५० कोटींची विशेष तरतूद

१ हजार ७३० कोटींचे एलबीटीचे उत्पन्न अपेक्षित, पण जुलैपासून जीएसटी लागू झाल्यास तितके उत्पन्न अशक्य

आदर पुनावाला संस्थेमार्फत हजार ठिकाणी दोन हजार लिटर बिन्स बसविण्याचे नियोजन

दवाखाने, प्रसुतिगृहे आणि रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही बसवणार

२०१७-१८ ते २०२०-२१ या कालावधीत ‘शहर आरोग्य योजना’ राबवण्यात येणार, यासाठी ५ कोटींची विशेष तरतूद

पुणे शहरातील २५ किलोमीटर एचसीएमटीआर रस्त्याचा ताबा, टीडीआर, एफएसआय आणि रिझर्व्हेशन क्रेडिट बॉण्ड आणि भूसंपादनाद्वारे ताब्यात घेणार

पूल दुरुस्तीच्या कामांसाठी ७ कोटींचा निधी

पब्लिक बायसिकल शेयरिंग सिस्टीम या प्रकल्पात ६८० अत्याधुनिक प्रकल्प प्रस्तावित, फेज – एकसाठी अंदाजे ३८८ स्टेशन्स प्रस्तावित, ४ हजार ६५० सायकलिंगचा वापर करण्यात येणार असून या कामासाठी १०० कोटींची तरतूद

बीआरटी प्रकल्पांतर्गत २०१७ अखेर शहरात ४६ किलोमीटरचे रस्ते, २१ किलोमीटर सातारा रस्ता, औंध आणि जुना मुंबई महामार्ग

मे ते जूनअखेर पहिल्या टप्प्यात १५५० बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात, संचलन तूटीसाठी १६२ कोटी १६ लाख रुपयांची तरतूद

७० हजार एलईडी दिवे ‘एस्क्रो’ तत्त्वावर बसवणार

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्मार्ट सिटीअंतर्गत ५१ प्रकल्पांचा आराखडा तयार

महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालय इंटरनेटच्या माध्यमातून जोडणार

महापालिकांच्या सर्व शाळांमध्ये ई लर्निंग उपक्रम, क्लासरूम आदी सुविधा

शिक्षण मंडळासाठी ३११ कोटींची, तर दुय्यम शिक्षणासाठी ५५ कोटींची तरतूद

पीएमपीएलसाठी ३९२ कोटींची तरतूद

शाश्वत वाहतूक व्यवस्थेसाठी ७०१ कोटी

खासगी वाहतुकीचा वापर ५० टक्क्यांनी कमी करण्याचा उद्देश, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे १५५० बस वाढवण्याचे नियोजन

सुनियोजित आणि समान पाणी पुरवठा योजनेसाठी ७८८ कोटी

२४×७ पाणीपुरवठा योजनेंतर्गत ८७ पाण्याच्या टाक्या बांधणे, १६०० किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था निर्माण करणे
स्मार्ट मीटर बसवणे, यासाठी ४३१ कोटींची तरतूद

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासाठी ५० कोटी, भामा असखेड योजनेसाठी १५० कोटी, कॅन्टोन्मेंट बंद पाईपलाईन योजनेसाठी ५० कोटी

पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी ८५ कोटी

घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी ४०० कोटी

घनकचरा व्यवस्थापनासाठी आऊटसोर्सिंगद्वारे गाड्या उपलब्ध करण्यासाठी ५० कोटी

बांधकाम व राडारोडा प्रकल्पावर प्रक्रिया करून त्यामधून इमारतींसाठी लागणारा माल तयार करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी ५ कोटी, रस्ते स्वच्छतेसाठी गाड्या खरेदीसाठी १५ कोटी

संगणिकृत एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी १० कोटींची तरतूद

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी ३३९ कोटी

याअंतर्गत नदीसुधारणा प्रकल्पासाठी ५० कोटी, शहरात शौचालये बांधणे, वितरणनलिका तयार करणे, सांडपाणी प्रक्रिया यासाठी २०० कोटींची तरतूद, शहराच्या वातावरणाची माहिती संकलित करण्यासाठी पर्यावरण सेन्सर बसवण्यासाठी ५० कोटी, शहरातील उद्यानांच्या विकासासाठी ३४ कोटी, झाडांच्या मोजणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ५ कोटींची तरतूद

माहिती व तंत्रज्ञान यासाठी ४५.२४ कोटी

यामध्ये महापलिकेचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी PMCCARE यासारखे प्रकल्प अद्ययावत करणे, तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल अॅप तयार करणे, डिजिटल पुणे यासाठी डिजिटल लिटरेसी सेंटर आणि महापालिकेच्या विविध ऑनलाइन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य विभागासाठी ५५.५२ कोटी
समाजविकास विभागासाठी ६८ कोटी, त्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना, आर्थिक दुर्बल महिलांसाठी कल्याणकारी योजना राबविणे आदींसाठी तरतूद
या वर्षीच्या अर्थसंकल्पातील सर्वाधिक ३१ टक्के रक्कम ही स्थानिक संस्थेच्या कर रुपातूत मिळणार आहे. तर २६ टक्के रक्कम ही मिळकत करातून प्राप्त होणार आहे. याशिवाय पाणीपट्टी आणि इतर माध्यमातून चांगले उत्पन्न अपेक्षित आहे.