रस्तेदुरुस्तीसह पावसाळापूर्व तयारीची सर्व कामे ३१ मे अखेर पूर्ण करण्याचे आदेश महापौर आणि महापालिका आयुक्तांनी दिले असले, तरी सर्व कामे या मुदतीत पूर्ण होतील अशी शहरातील सध्याची परिस्थिती नाही. उलट, अनेक रस्ते नव्याने उखडले जात असल्याचे चित्र नागरिकांना पाहायला मिळत आहे. काही रस्ते सिमेंटचे करण्यासाठी

रस्ते खोदाईला परवानगी नसली तरी भुसारी कॉलनीत मात्र रस्ता खोदून सिमेंटचा रस्ता करण्याचे काम जोरात सुरू आहे.
रस्ते खोदाईला परवानगी नसली तरी भुसारी कॉलनीत मात्र रस्ता खोदून सिमेंटचा रस्ता करण्याचे काम जोरात सुरू आहे.

उखडले जात आहेत. तसेच ड्रेनेज आणि अन्य कामे करण्यासाठी उखडलेले रस्ते अद्याप दुरुस्त झालेले नाहीत.
पावसाळापूर्व तयारीच्या कामांचा आढावा गेल्या महिन्यापासून सातत्याने घेतला जात आहे. गेल्या महिन्यापासूनच त्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असून रस्त्यांची खोदाई कोणत्याही परिस्थितीत २० मे नंतर करू नये असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार विविध कंपन्यांकडून केबल टाकण्यासाठी सुरू असलेली खोदाई थांबली असली, तरी महापालिकेच्या विविध खात्यांकडून मात्र शहरात अनेक ठिकाणी खोदकामे सुरू असल्याचे दिसत आहे. काही रस्ते सिमेंटचे करण्यासाठी खोदाई सुरू असून, काही रस्त्यांवर सध्या काँक्रिटीकरण केले जात आहे. त्याबरोबरच ड्रेनेज खात्याकडून पाइप टाकण्याची कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत. ही कामे झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची कामे करण्यात आलेली नाहीत.
भुसारी कॉलनीत नव्याने रस्ता
उजवी भुसारी कॉलनी येथे दोनच दिवसांपूर्वी पं. भीमसेन जोशी उद्यान ते न्यू इंडिया स्कूल यांना जोडणारा चारशे मीटर लांबीचा रस्ता सिमेंटचा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, सध्या रोज थोडा थोडा रस्ता उखडून टप्प्याटप्प्याने हे काम केले जात आहे. मुळातच आधीचा डांबरी रस्ता अतिशय चांगल्या स्थितीत असताना नव्याने खर्च करून संपूर्ण रस्ता काँक्रीटचा करण्याचे कारण काय, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. मात्र त्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यापूर्वीच रस्ते खोदायला परवानगी नसतानाही हा रस्ता आता खोदला जात आहे.
नीलायम चित्रपटगृहाकडून सिंहगड रस्त्याकडे जाणारा रस्ता गेले अनेक महिने पाइप टाकण्यासाठी खणून ठेवण्यात आला होता. या ठिकाणी पाइप टाकण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी रस्ता मात्र पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्यावर कामाचे साहित्य तसेच मातीचे ढिगारे आणि राडारोडा पडला आहे. विविध कामांसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी तसेच डांबरीकरण करण्यासाठी ३१ मे पर्यंतची मुदत असून हा रस्ता मुदतीत पूर्ण होणार का असा प्रश्न आहे.