22 August 2017

News Flash

PMC election 2017 : मुळा, मुठा हे काय नाव आहे का; बदलून टाका- व्यंकय्या नायडू

बॉम्बेचं नामकरण मुंबई केलं तसलं काहीतरी करा.

पुणे | Updated: February 20, 2017 5:14 PM

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू पुण्यात प्रचारासाठी आले आहेत. मात्र, त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मुळा आणि मुठा नद्यांसंदर्भात केलेल्या एका टिप्पणीमुळे पुणेकरांचा स्वाभिमान दुखावला जाण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुकांचा माहौल असल्यामुळे राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. मुळा मुठा हे काय नाव आहे का? बॉम्बेचं नामकरण मुंबई केलं तसलं काहीतरी करा, असे नायडू यावेळी बोलून गेले. पुण्यातील प्रादेशिक आणि भावनिक राजकारणाशी नायडू परिचित नसल्यामुळे त्यांनी अनावधानाने हे विधान केल्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकीच्या तोडांवर त्यांचे हे विधान प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावरून भाजपला नक्कीच अडचणीत आणणारे ठरू शकते.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत नायडू यांनी ‘सामना’ वृत्तपत्रावर बंदी घालण्याच्या मागणीवरून भाजपला घरचा आहेर दिला. वर्तमानपत्रावर बंदी घालणे हा आमच्या पक्षाचा सिद्धांत नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही वर्तमानपत्रावर बंदी घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार नाही. ज्यांना जे लिहायचं ते लिहू द्या. पंतप्रधानांविरोधात लिहिणार असतील, तर ‘सामना’ स्वत:च आपली पातळी आणखी घसरवेल, असे नायडू यांनी सांगितले. तसेच नायडूंनी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या पक्षांतर्गत राजकारणावरूनही नेत्यांना कानपिचक्या दिल्या. एखाद्याला पक्षात प्रवेश देताना किंवा उमेदवारी देताना काळजी घ्यायला हवी, असे नायडू यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाचा रोख भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना प्रवेश देण्याकडे होता. तसेच शिवसेनेकडून भाजपवर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेसंदर्भातही त्यांनी भाष्य केले. सेना-भाजपकडून एकमेकांवर करण्यात येणारी टीका आदर्श नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे सेनेकडून टीका करण्यात येत आहे. आयुष्यभर काँग्रेसवर टीका करणाऱ्या सेनेकडून होणारं काँग्रेसचे कौतूक न समजण्यापलीकडे आहे, असे नायडू यांनी म्हटले.

२० आणि २१ फेब्रुवारीला सामना पेपर प्रसिद्ध केला जाऊ नये, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली होती. १५ फेब्रुवारीच्या अंकात आचारसंहितेचा भंग झाला असून कारवाई करा, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून सामनाला याबाबत अभिप्राय कळविण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी आयोगाकडून शिवसेनेला तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

First Published on February 17, 2017 11:48 am

Web Title: pmc election 2017 bjp may face problem due to controversial statement of venkaiah naidu
 1. M
  manish
  Feb 17, 2017 at 10:21 am
  आता तरी जागे व्हा मराठी लोकांनो. मनसे ला निवडून द्या
  Reply
  1. N
   nishant
   Feb 17, 2017 at 7:30 am
   नायडू साहेब जरा बापट साहेबांची परवानगी काढा हि वाक्य बोलण्यासाठी.....नवा तुमची बदला किती दिवस देवाच्या नावाच्या कुबड्या घेऊन चालणार नायडू साहेब...फ ची आणि भ ची बाराखडी म्हणा. कि ऐकवू?
   Reply
   1. N
    nishant
    Feb 17, 2017 at 7:37 am
    मुळा....मूळ....मूल...उगम....सुरवात....नावीन्य....चाकोरीला लाथ.....अगदी.....
    Reply
    1. P
     Prasad
     Feb 17, 2017 at 6:54 am
     नावे उगीच बदलू नयेत. पण मुळा, मुठा.. ही नावे अजबच आहेत.. हे मान्य.. आता पुणेकर "अखिल भारतीय मुळा मुठा मित्रमंडळ ' स्थापन करतील.
     Reply
     1. R
      rahul
      Feb 17, 2017 at 12:14 pm
      भाजप ने ,प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची संपत्ती जाहीर करावी..प्रमोद महाजन आणि रशिया,आफ्रिका यांचे काई नाते होते ते एकदा जाणते ला कळू द्ययवे . सलमान खान ला निर्दोष सोडण्यासाठी ,सलमान कडू किती करोड चा पार्टी फंड घेतला ते सांगावे...सर्व भाजप सध्या उद्धव ठाकरे यांचावर तुटून पडली आहे...जनतेने संवाद राहावे..सर्व आरोप खोटे आहेत.....जय महाराष्ट्र.
      Reply
      1. R
       Ramdas Bhamare
       Feb 17, 2017 at 7:12 am
       घशात मुळा अडकल्यासारखा चेहरा करून वावरणारे हे महाशय मोदींना परमेश्वराचा अवतार समजतात आणि त्यांच्या हो ला हो करत असतात , म्हणून यांचे नाव होयडू किंवा होयबा ठेवावे . नायडू किंवा नायबा हे नाव बरे वाटत नाही .
       Reply
       1. R
        Ramdas Bhamare
        Feb 17, 2017 at 7:39 am
        भाजप मतदारांना गाजर दाखवते . आता मतदार भाजपला मुळा दाखवतील !
        Reply
        1. R
         Raj
         Feb 17, 2017 at 11:45 am
         कृपया चिकनचा अपमान करू नका !
         Reply
         1. R
          Raj
          Feb 17, 2017 at 11:51 am
          यांच्या मातृभाषेचे नाव तेलगू आहे ते बरोबर नाही वाटत ऐकायला, ते पण बदला, त्यातील 'तेल' शब्द वगळून टाका मग पहा यांची अस्मिता!
          Reply
          1. R
           Raj
           Feb 17, 2017 at 7:10 am
           हि व्यक्ती नेहमी लुंगी घालून असते, का तर ती त्यांची प्रादेशिक अस्मिता! मुळा मुठा हि पण आमची प्रादेशिक अस्मिता आहे, ती नावे का म्हणून बदलायची? या अण्णाच्या म्हणण्यावर? बदलायची असेल तर यांनी आपली लुंगी बदलून फुलपॅण्ट घालावी.
           Reply
           1. B
            Bapu सर्वगोड
            Feb 17, 2017 at 6:27 am
            व्यंकय्या हे कसलं नाव ? बदलून टाका !!
            Reply
            1. S
             Shail
             Feb 17, 2017 at 9:39 pm
             ओह मिस्टर नायडू , व्हॉट कॅन आय डू ?
             Reply
            2. S
             shrikant
             Feb 17, 2017 at 7:59 am
             व्यंकय्या हे काय नाव आहे - त्याऐवजी याचे नाव 'चमचा' करा !
             Reply
             1. S
              Siddhesh
              Feb 17, 2017 at 6:22 am
              हो आम्ही बदलणारच आहोत....केंद्र आणि राज्य सरकार!!
              Reply
              1. S
               Shriram
               Feb 17, 2017 at 6:35 am
               नायडू सामना बंदीबद्धल बोलले ते योग्यच आहे. कारण गटाराच्या वास जितके जास्त दिवस पसरेल तितका त्या वासाचा तिटकारा येतो त्यामुळे 'सामना' रुपी गटार निवडणुकीच्या दिवशी सुद्धा वाहत राहणे हे भाजपच्या दृष्टीने फायद्याचेच आहे. आणि त्या गटार-पाण्याचे कालवे लोकसत्तासकट अनेक माध्यमे आपल्या भागातून काढत असल्याने तो दुर्गंध सर्वत्र घमघमत आहे आणि आपले काम योग्य रीतीने करत आहे. पण या प्रकरणात निवडणूक आयोगाचे पुरते वस्त्रहरण होऊन सर्व जण त्याला जाता येता टप्पल मारत आहेत. आयोगाचा काहीच धाक उरला नाही.
               Reply
               1. S
                sudhara
                Feb 17, 2017 at 10:26 am
                अफझल खानचे वकील कृष्णाजी भास्कर .....तुमच्या वकिलीला लगाम घाला शत्रूला फितूर झालेले श्रीराम बापट दादर वाले
                Reply
                1. S
                 sudhara
                 Feb 17, 2017 at 10:16 am
                 चांदीचा (मोदींचा) चमचा
                 Reply
                 1. S
                  Sandeep
                  Feb 17, 2017 at 12:36 pm
                  व्यंकय्या नायडू हे पण काय नाव आहे , बदलूया का ?
                  Reply
                  1. V
                   VIjay
                   Feb 17, 2017 at 8:53 am
                   व्यंकय्या कोल्हे कुई बंद करा. तुम्हाला उच्चार नाही येत तो तुमचा प्रॉब्लेम आहे.
                   Reply
                   1. विकास खामकर
                    Feb 17, 2017 at 8:54 am
                    हे दिल्लीतील पक्षांचे नेते मूर्खच असतात.तोंडाला येईल ते बोलतात.आणी वरून यांना निवडून द्या म्हणे!! आवरा या व्यंकय्याला.मुळा-मुठा युगानुयुगे वाहत आहेत.यांचा पक्ष आत्ता जन्ा आहे.
                    Reply
                    1. Y
                     yogesh more
                     Feb 17, 2017 at 1:36 pm
                     "मुळा मुठा ही काय नावे आहेत का? बॉम्बेचे मुंबई केले तसे काहीतरी करा" असे व्यंकैया नायडू म्हणालेत. आता मनाची तयारी करा नाशिकचे नासिक, सोलापूरचे शोलापूर, धुळे नाही तर धुलिया होणार तेही शासकीय पातळीवर, एकंदरच माय मराठीचे 'ळ' हे अक्षर नामशेष होणार. ज्या अक्षरांचा यांना उच्चर जमत नाही ते सर्व नष्ट होणार.
                     Reply
                     1. Load More Comments