मुळच्या सोलापूरच्या व यमगर वाडी या पारधी समाजातील मुलांसाठी सुरु केलेल्या शाळेतील पहिल्या विद्यार्थी राजश्री ज्ञानेश्वर काळे या आज प्रभाग ७ अ मधून निवडून आल्या. त्या भाजपकडून निवडणुकीला उभे होते. राजश्री काळे या राज्यातील पहिल्या पारधी समाजातील नगरसेविका ठरल्या आहेत. शिपाई ते नगरसेवक या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
वाकडेवाडी येथील राहणाऱ्या व गरवारे महाविद्यालयात शिपाई म्हणून त्या काम करतात. पहिल्यांदा निवडणुक लढ़वली आणि विजयी झाले. मी पारधी समाजातील पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा होता. काळानुरूप बदल होत गेला आणि समाजाने स्वीकारले. समाजासाठीही मी मागील पाच वर्षांपासून तळागळापर्यंत काम केले आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत झाला. या पुढील काळात समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्या पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध काम करू लागल्या, यमगर वाडीत त्या शिकत होत्या. रात्रशाळेतून त्यांनी नववी पर्यंतचे शिक्षण घेतले. राजश्री काळे या सुरवातीपासून संघाचे काम करू लागल्या. त्यांनी राजश्री आदिवासी पारधी संस्था स्थापन केली आहे.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी
AAP workers attempt to enter Nitin Gadkaris campaign office in Nagpur
नागपुरात गडकरींच्या प्रचार कार्यालयात शिरण्याचा आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न