प्रभाग क्रमांक २३ हडपसर गावठाण-सातववाडी

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या हडपसर गावठाण-सातववाडी (प्रभाग क्रमांक २३) या परिसरातील राजकीय समीकरणे त्या-त्या निवडणुकीनुसार बदलत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावरच विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
AIMIM chief Asaduddin Owaisi criticised India Bloc Loksabha Election 2024
मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

हडपसर गावठाण-साततवाडी परिसरामध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगली मते मिळाली होती. मात्र विधानसभेचे गणित आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची निवडणुक यात फरक असतो, हे मागील महापालिकेच्या निवडणुकी वेळीही दिसून आले होते. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांना काँग्रेसकडून पराभवाचा धक्का बसला होता. हा प्रभाग नव्याने झाला असला तरी राजकीय परिस्थितीही बदलतीच राहण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक ४२, ४४ आणि ४५ मधील काही भाग एकत्रित करून या प्रभागाची निर्मिती झाली. काळेपडळ, ग्लायडिंग सेंटर, गोंधळेनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, निर्मल टाउनशिप, वर्धमान टाऊनशिप, ससाणेनगर, वैभव सिनेमा असा काही भागाचा या प्रभागात समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेसच्या एक आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. सध्याच्या प्रभाग क्रमांक ४५ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी मनसेत प्रवेश करीत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले फारूक इनामदार यांनी विजय मिळविला होता. या निवडणुकीला काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. सन २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या विजया वाडकर यांनी माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांना पराभूत केले होते. तर प्रभाग क्रमांक ४४ मधील शिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. दरम्यान, भानगिरे हे पुन्हा शिवसेनेत आल्यामुळे शिवसेनेची या भागातील ताकद वाढली आहे. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी नगरसेवक दत्तात्रय ससाणे यांच्यासह हडपसरमधील काही मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला काही प्रमाणात फायदा झाल्याचे दिसून येत आहे. या राजकीय परिस्थितीमध्ये गणितेही बदलत असल्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, हेच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. हडपसर परिसरात माळी आणि मराठा समाजातील वर्चस्वावरून रस्सीखेच राहिली आहे. या प्रभागात एक जागा ओबीसी महिलेसाठी आणि एक जागा ओबीसी खुल्या गटासाठी आहे.