न्यायालयाकडून तीन दिवस पोलीस कोठडी

पिंपळे गुरव भागात बांधकाम व्यावसायिकावर झालेल्या गोळीबारप्रकरणात औंध भागातील माजी नगरसेवकाच्या मुलीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. तिला पिंपरी न्यायालयाने बुधवापर्यंत (२८ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

bmc employees removed artificial lights on trees
प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
osho marathi news, osho aashram pune marathi news
ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा तडाखा, पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली
Patanjali Expresses Regret
बाबा रामदेव यांना धक्का; सर्वोच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर ‘पतंजली’ची बिनशर्त माफी

आदिती कैलास गायकवाड (वय २५, रा.गायकवाडनगर, औंध) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार (वय ३५,रा. पिंपळे गुरव) यांनी यासंदर्भात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेलार शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव भागातील श्री तुळजाभवानी माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन मोटारीकडे निघालेल्या शेलार यांच्यावर दुचाकीस्वार हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी झाडलेली गोळी शेलार यांच्या पायात शिरल्याने ते गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर शेलार यांच्या पायातील गोळी काढण्यात आली.

आदिती गायकवाडने हल्लेखोरांना मला मारण्यासाठी सुपारी देऊन गोळीबार करण्यात आल्याची तक्रार शेलार यांनी पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. आदिती गायकवाडला पोलिसांनी संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिने शेलार यांचा खून करण्यासाठी हल्लेखोरांना सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. आदिती आणि योगेश शेलार यांची ओळख आहे. आदितीच्या वडिलांनी फेब्रुवारी महिन्यात पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढविली होती. त्या वेळी प्रचारफेरीत सहभागी होण्यास आदितीने योगेशला विरोध केला होता. या कारणावरुन त्यांच्यात वादही झाले होते. दरम्यान महापालिका निवडणुकीत गायकवाड यांचा पराभव झाला. वडिलांच्या पराभवास योगेश जबाबदार असल्याचा संशय तिच्या मनात होता. याकारणावरुन तिने शेलार यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, आदितीला पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानंतर रविवारी पिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला २८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. एम. भोये तपास करत आहेत.